महाराष्ट्र वेदभुमी

केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; रश्मीता पोपेटा यांचे उपोषण वाया जाणार नाही..प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचार सुरू;

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील): नामकरणाच्या लढ्याला मिळत आहे वाढता जनसमर्थन ८ऑगष्ट २०२६ चक्काजाम करून सरकारला जागे करण्याचा निर्णय भुमिपुत्रांनी घेतला आहे... वार : मंगळवार  दिनांक : ३० जून २०२६ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे... या मागणीसाठी भूमिपुत्र कन्या रश्मीता पोपेटा यांनी केलेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण नवी मुंबई, रायगड आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी जनजागृती झाली आहे...

सलग अनेक दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .. मात्र, आंदोलनकर्त्यांचा विश्वास आहे की, "रश्मीता पोपेटा यांचे उपोषण वाया जाणार नाही..." या आंदोलनामुळे नामकरणाचा प्रश्न पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चेत आला आहे...

राज्य सरकारने यापूर्वी नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याचे सांगितले होते... मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय किंवा अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नसल्याने भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि आगरी-कोळी समाजामध्ये प्रतीक्षेची भावना कायम आहे...

दरम्यान, रश्मीता पोपेटा यांच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटना, प्रकल्पग्रस्त, युवक आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे... अनेक ठिकाणी जनजागृती, निदर्शने आणि आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, सोशल मीडियावरही या विषयाला मोठा प्रतिसाद मिळत आहे...

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, लोकनेते दि. बा. पाटील यांनी नवी मुंबई उभारण्यासाठी जमीन दिलेल्या शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला... त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देणे हा केवळ नामकरणाचा विषय नसून, भूमिपुत्रांच्या त्यागाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान आहे...

सध्या सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले असून, आंदोलनकर्त्यांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे... त्याचवेळी रश्मीता पोपेटा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे...शरद पाटील नवीमुंबई यांनी माहिती दिली...

Post a Comment

Previous Post Next Post