आलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव): आलिबाग तालुक्यातील देहेन भाकरवड या गावाला जोडणारा पुलाचे अपुर्ण काम पर्यायी उभारण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात वाहूनं गेल्यामुळे आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटला...
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या सौ.चित्रलेखा पाटील यांनी देहेन गावाला भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता
अधिकाराच्या दृलर्क्षपणाबाबत नाराजी व्यक्त केली.पाच दिवसात पर्यायी पुलाची व्यवस्था करा अन्यथा शेकाप स्टाईलने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा शेकापच्या वतीने देण्यात आला आहे...
यावेळी चित्रलेखा पाटील समवेत आलिबाग तालुका सरचिटणीस नरेश म्हात्रे, अनिल पाटील,विलास म्हात्रे,विजय पाटील,कौशिक पाटील,मोरा गुरूजी ,दिसंबर म्हात्रे,निलेश चवरकर,विक्रांत वार्डे इतर मान्यवर ग्रामस्थ शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते...
