सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : वनपरिक्षेत्र रामटेक अंतर्गत येणाऱ्या आसोली शेत शिवारात पेंच कॅनलच्या पाटात असलेल्या पाईपमधे बिबट्याचे पिल्लू अडकून असल्याची माहिती मिळाला... माहिती मिळताच वनाधिकारी तथा वन कर्मचाऱ्यांटी टीम तत्काळ मौकास्थळी रवाना झाली व बिबट्याच्या पिल्लाचे सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले... सर्वप्रथम पाईपमध्ये फसलेल्या पिल्लाची पहाणी केली व नजीकच्या शेतकऱ्यांना विचारले असता काही जणांनी मादा बिबटला बघितल्याबाबत सांगितले... तेव्हा रात्री ती बिबट मादा त्या पिल्लाजवळ येईल व घेऊन जाईल असे वाटले... त्यामुळे मौकास्थळी लाईव्ह कॅमेरा व ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आणि रात्रभर वनविभागाच्या चमूने नजीकच्या क्षेत्रात राहून निगराणी केली... दुसऱ्या दिवशी कॅमेरे तपासले असता मादा बिबट तिथे आली नसल्याचे समजले... तेव्हा वनविभागाच्या चमूने पाईपमध्ये जाऊन पिल्लाला सुरक्षितरित्या बाहेर काढले... वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार पिल्लास टीटीसी नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले... रेस्क्यू करण्यासाठी डॉ विनिता व्यास उपवनसंरक्षक व गोविंदा लुचे सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राहुल शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक, लोणारे राऊंड ऑफिसर रामटेक, वनरक्षक घोरपडे, डोंगरे, बलगेवार, सोदगीर व वनमजूर यांनी सहकार्य केले...
