सचिन चौरसिया प्रतिनिधी :
रामटेक : कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथे नुकताच वार्षिक दिन व पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला... सायंकाळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची रंगत अधिक वाढवली. समारंभाचे उद्घाटन लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नोलॉजिकल विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते झाले... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वोडिथला शिक्षण संस्था, हैदराबादचे सचिव व्ही. श्रीनिवासराव तर प्रमुख अतिथी म्हणून किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, समन्वयक डॉ. शीवाप्रसाद, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, विद्या विभाग अधिष्ठाता डॉ विलास महात्मे , विद्यार्थी प्रतिनिधी विनोद मेट्टा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. अतुल वैद्य यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारत हा तरुणांचा देश असून देशाला आत्मनिर्भर व विकसित बनवण्यासाठी तरुणांनी कठोर परिश्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले... दरम्यान अध्यक्षीय भाषणात व्ही. श्रीनिवासराव यांनी संस्थापक व्ही. राजेश्वरराव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले... आधुनिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले... प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा मांडला. डॉ. ई. शीवा प्रसाद यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला... याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३६ प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला... तसेच विद्यार्थ्यांना एकूण १ लाख २३ हजार रुपयांचे नगद पुरस्कार, प्रशस्तीपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली... कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंजली नरड, जसविनी गुलापल्ली व संस्कार मुरले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विलास महात्मे यांनी मानले...
