महाराष्ट्र वेदभुमी

संतोष येरूनकर यांचा सेवापूर्ती सोहळा मित्र परिवाराकडून साजरा.

कोलाड  (श्याम लोखंडे):आपल्या मित्र परिवारातील एक लोकप्रिय आणि आदर्शवत सभासद की मित्र परिवार मंडळातील कोणतेही उपक्रम अथवा विविध कार्यक्रम असो संतोष येरूनकर हे कोणत्याही सभासदाकडे कार्यक्रमासाठी तत्परतेने आदराने धावत जाणारे एक परोपकारी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख चिंचवली गावचे सुपुत्र जे गावातही लोकप्रिय असणारे आणि नावाजलेले. संतोष येरूनकर हे रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रातील एका नामवंत कारखान्यात कर्मचारी म्हणून इमाने इतबारे सेवा करणारे व्यिक्तिमत्व कलरकेम् ,क्लॅरीअंट , ह्युबाखं, तद्नंतर आता सुदर्शन युनिट दोन मध्ये कामाची सेवा पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले असे मित्र परिवारातील संतोष येरूनकर यांचा सेवा निवृत्तीचा सोहळा त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने श्री समर्थ नगर कोलाड आंबेवाडी येथे मोठा उत्साह वातावरणात त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या...

गेली अनेक वर्षे येरूनकर यांनी नित्यनेम कारखान्यात विविध प्रकारचे काम करत सेवा केली त्याच बरोबर कामगारांच्या हितासाठी त्यांनी काही वर्ष नियमित कामगार युनियनची लीडरशिप बजावत कामगार हिताचे चांगले काम केले.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे, गावा प्रमाणेच एक सलोख्याच नात समर्थ नगर मध्ये ठेवत सर्वांजवळ प्रेमाने वागणारे, सर्वांचे हाकेला धावून जाणारे  संतोष रघुनाथ येरुणकर हे त्यांच्या नोकरीचा कार्यकाळ संपवून सेवानिवृत्ती झाले.कारखान्यात त्यांच्या व्यवस्थापक यांनी सेवापुर्ती सोहळा फार मोठ्या उत्साहात साजरा केला.येरुणकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल बद्दल बऱ्याचश्या त्यांच्या सोबतच्या कामगारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल गौर उदगार काढले. त्यांच्या स्वभावाबद्दल आणि कामाबद्दल फारच त्यांचाकामाच कौतुक केले. त्यांच्या प्रेमळ पणाने प्रत्येक कामगारांच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रूचे पाठ वाहिले. सर्वांबरोबर वागण्याची त्यांची पद्धत, व आपलेपणा अतिशय चांगले होते सुरक्षित काम करण्याची परंपरा आणि कामाची जबादारी हे गुण त्यांच्या अंगी होते.हे सर्व कौतुक बघण्यासाठी सेवापूर्ती सोहळ्याला आवर्जून उपस्थित त्यांचे कुटुंबीय तसेच गावातील मित्रमंडळी यांनाही फार समाधान वाटले.अशा या नावाजलेल्या कंपनीत चांगले वर्तन करून सेवा पूर्तता करताना येरुणकर यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने तसेच कर्मचारी याच्या माध्यमातून त्यांचे सेवा निवृत्त सन्मान करत त्यांना भरभरून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर कोलाड आंबेवाडी येथील श्री समर्थ नगर येथील त्यांचे मित्र परिवाराने देखील त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात त्यांच्या येरूनकर यांच्या कुटुंबीय समावेत मोठ्या उत्साहात केला. त्यामुळे हा सेवापूर्ती सोहळा सर्वांच्या कायम स्वरुपी स्मरणात राहणार असल्याचे येरूनकर यांच्या कुटुंबीय यांनी सांगितले ...

Post a Comment

Previous Post Next Post