विनामूल्य रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान, श्रीक्षेत्र नाणीजधाम यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत महामार्गावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा यात्री निवास, मनसर येथे शनिवार (दि.०४) ला सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला... उद्घाटन रामटेक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे यांच्या हस्ते झाले... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामटेकचे पोलिस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघमारे, माजी जि.प. सदस्य नरेश धोपटे, संजय झाडे, सतीश डोंगरे, गज्जुभाऊ यादव, सोनू तिवारी तसेच संस्थेचे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर प्रमुख राजेंद्र भोयर, पूर्व विदर्भ सह उपपीठ प्रमुख सुरेश लाखे, व्यवस्थापक पूर्व विदर्भ प्रवीण वासुदेवजी परब, पूर्व विदर्भरुग्णवाहिका प्रमुख जगदीश फालक, ज.न.म. भक्त सेवा मंडळ नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश कानडे व ज.न. म. प्रवचनकार ताराचंद भिवगडे यांची विशेष उपस्थिती लाभली. नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजोपयोगी अशा या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे...
