महाराष्ट्र वेदभुमी

नाशिक आयटी कंपनीत (टीसीएस, बीपीओ) लैंगिक शोषण व व लवजिहाद प्रकार

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील ): नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत (टीसीएस बीपीओ) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला असून, एप्रिल २०२६ च्या मध्यापर्यंत ९ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

धर्मांतराचा प्रयत्न: हिंदू कर्मचाऱ्यांना (महिला आणि पुरुष) विशिष्ट धर्मात धर्मांतरित करण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांना नमाज पठण करणे आणि गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

लैंगिक शोषण: महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अश्लील शेरेबाजी आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप आहेत..दबाव टाकून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन किंवा खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून अत्याचार केले जात होते..

आरोपी आणि कारवाई: याप्रकरणी टीम लीडर्स (शफी शेख, रझा मेमन, दानिश शेख, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तर) आणि एचआर मॅनेजर अश्विनी छननानी यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे... हे प्रकरण गंभीर असल्याने याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. यात 'टेरर फंडिंग' किंवा आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे...

कॉर्पोरेट जिहाद'चा आरोप: भाजपाने या प्रकरणाला 'कॉर्पोरेट जिहाद' म्हटले असून, हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे...

या घटनेमुळे नाशिकच्या आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, पीडितांना न्याय मिळावा आणि कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. आता या पीडितांना न्याय कधी मिळतो व  गुन्हेगारांना काय शिक्षा होते याकडे सर्वाचे लक्ष आहे.या विकृतीला चाप बसलाच पाहिजे असे कायदे बनवून अंमलात आणावे. तर अशा गुन्हेगारी वृतीला आळा बसेल!

Post a Comment

Previous Post Next Post