महाराष्ट्र वेदभुमी

कांद्री वस्ती परिसरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक :- तालुक्यातील कांद्री वस्ती येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली... शनिवार (दि.०७) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली... आकांशा कुंदन लांजेवार (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे... आकांक्षा हिने रहात असलेल्या घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली...

 मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे वडील ऑटो चालक असून भाऊ हा डीजे ऑपरेटर असल्यामुळे तोही बाहेर गेला होता... तर आई शेळ्या चारण्यासाठी बाहेर गेली होती... घरात कोणीही नसल्याचे पाहून संबंधित तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले... सायंकाळी आई शेळ्या चारून घरी परतल्यानंतर मुलगी पंख्याला  गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसली... ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली... घटनेची माहिती मिळतात ते रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला... पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे... आत्महत्येची निश्चित कारण समजू शकले नाही पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post