महाराष्ट्र वेदभुमी

होळीनिमित्त गळ (मंडई) सिंदेवानी व कट्टामध्ये रंगमय वातावरण

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक :- होळीनिमित्त पारंपारिक गळ (मंडई ) दरवर्षीप्रमाणे सिंदेवाणी व कट्टा गावात धार्मिक नाटक "कलंकनी बहु उर्फ गाजिया खान का तहलका" हे नऊ अंकी नाटक सादर करण्यात आले... स्थानिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी होळीनंतर या भागात गळ (मंडई ) चे आयोजन केले जाते... कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी कर्मचारी संघटनेचे विजय कोकोळे होते. कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य शांता कुमरे, हरीश उईके, सोडुम संघटनेचे अध्यक्ष अँड. मुकेश पेंदाम, कट्ट्याच्या सरपंच वनिता टेकाम, माजी सरपंच ईमरचंद भलावी, उपसरपंच विशाल वरठी, पत्रकार कैलास निगोट, माईन पठाण, माजी सरपंच उमेश भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते... मंडईमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली... गावातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले... सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उसा आणि परिसरातील पारंपरिक संस्कृती झलक दिसून आली...

Post a Comment

Previous Post Next Post