राजस्थानी विष्णु समाजाच्या वतीने दरवर्षी होळी उत्सवानिमित्त रंगपंचमी महोत्सव मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो... यंदाही या परंपरेला अनुसरून मोर्बा रोडवरील प्रकाश सेठ जैन यांच्या फार्महाऊस परिसरात भव्य आयोजन करण्यात आले होते... या कार्यक्रमासाठी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार व आनंदशेट यादव यांना विशेष निमंत्रण दिले होते...
मान्यवर आगमन होताच समाजातील सदस्यांनी त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने भव्य स्वागत केले... राजस्थानच्या प्रसिद्ध परंपरेनुसार बँडच्या गजरात स्वागत करण्यात आले... यावेळी परिसरात सणाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले...
कार्यक्रमस्थळी मोठे शामियाने, पंडाल, फ्लड लाईट्स, रंगीबेरंगी झगमगती दिव्यांची सजावट करण्यात आली होती. समाजातील शेकडो सदस्य पारंपरिक राजस्थानी पोशाखात उपस्थित होते. महिलांनी एका बाजूस आपल्या पारंपरिक देवतांच्या गीतांवर नृत्य सादर करत सणाला रंगत आणली होती. युवक, लहान मुले आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घेताना दिसत होते...
दर वर्षी प्रमाणे यंदाही ही रंगोत्सव साजरा केला , तसेच गौसेवा साठी पण दरवर्षी प्रमाणे निधी जमा करण्यात आले व गौशाळेला समर्पित करण्यात आले.. ह्या मंडळाकडून अधून मधून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते ... तसेच वृद्धाश्रमाना पण सहाय केले जाते... हे सर्व कार्य एक सामाजिक बांधिलकी ह्या भावनेने केली जाते ... व्यक्तिगत नांवाचे यश घेतले जात नाही... सर्वजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतात ...
दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती मिळताच अनेक समाजबांधव पुढे येऊन त्यांचे स्वागत करत कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली... या प्रसंगी मान्यवरांनीही समाजाच्या एकोप्याचे कौतुक करत अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजातील बंध अधिक दृढ होतात, असे मत व्यक्त केले...
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना आणि समाजबांधवांना प्रसिद्ध राजस्थानी पारंपरिक मेजवानीचा आस्वाद देण्यात आला... अशा उत्साहपूर्ण वातावरणात राजस्थानी विष्णू समाजाचा होळी महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला...
