महाराष्ट्र वेदभुमी

मोकाट गुरांमुळे देवकान्हे परिसरातील शेतकरी संतप्त, मालकांनी बंदोबस्त करा अन्यथा परवानगींशी गो शाळेत धाडण्यात येतील, संतप्त शेकऱ्यांचा एल्गार.

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील तसेच देवकान्हे परिसरातील शेतकरी मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे चागलेच आक्रमक झाले आहेत... तर ही मोकाट गुरे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी संतापले आहेत... तर त्यांचा बंदोबस्तासाठी सदरील खात्याला या बाबतचे शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी येथील शेतकरी एकत्रित येऊन निवेदन देणार आहेत...

इको सिन्स्विटी झोन विरोधात येथील शेतकऱ्यांची झालेला एकोपा हा अत्यंत योग्य ठरत आहे त्यामुळे शेती कामासाठी तसेच विविध शेती योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्वाचा ठरत आहे... गेली पंधरा वर्ष कळवा असून शेतकऱ्यांना पाणी मिळत नसे काळवा दुरुस्तीच्या नावाखाली कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते मात्र येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन याचा पाठपुरावा करत खात्याला निवेदन देत पाण्याची मागणी करताच कालव्याला पाणी सोडण्यात आले... त्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी भात शेती लागवड केली तर काही शेतकऱ्यांनी सामूहिक भाजीपाला लागवड , काहींनी कलंगड लागवड केली असून काहींच्या फळ बागायत असल्याने मेहनतीने आणि पराकाष्ठा करून विविध पीक घेतले जात असल्याने या मोकाट गुरांचा हैदोस त्यांचा मेहनतीच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याने याबाबत बुधवारी येथील शेतकऱ्यांनी एकत्रित धानकान्हे येथे सर्व शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती... या सभेला युवा शेतकऱ्यांसह प्रमुख ज्येष्ठ शेकऱ्यांचीही मोठी उपस्थिती लाभली होती...

मोकाट गुरांना पायबंदी घालण्यासाठी येथील शेतकरी गप्प बसणार नाही तर सदरच्या आयोजित सभेत सर्वानुमते ठरवितात आले आहे की वरील सुटलेले ही मोकाट आणि उन्नाड गुरे कोणी कोणी मालकांची असल्यास येत्या तीन चार दिवसांत त्यांना दावणीला बांधून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे... अन्यथा सदरील खात्याला निवेदन देण्यात येत असून त्यांना रेस्कु करून गो शाळेत धाडण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरवितात आले... यावेळी प्रगतशील शेतकरी तथा तळवली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे, देवकान्हे ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच बाळा भोईर, तळवली ग्राम पंचायत सरपंच रवींद्र मरवडे, किशोर भोईर, डॉ.श्याम लोखंडे, धोंडू कचरे, संतोष भोईर, पांडुरंग गोसावी, तळवली येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ एस पी जाधव, परिसरातील महेश मरवडे, दयाराम मरवडे, देवकान्हे पोलिस पाटील दयाराम भोईर, बाहे गावचे पोलीस पाटील मनोज थिटे, खेळू थिटे,बबन जाधव, नथुराम हळदे, सुरेश भोईर, मोरेश्वर भोईर, किशोर कान्हेकर, संदेश लोखंडे, अरविंद भिलारे, चंदू गोसावी, संतोष राऊत, काशीराम घायले, लिंबाजी टीकोने, राजेंद्र महाडिक, साहिल साबळे, सह तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, बाहे येथील युवा शेतकऱ्यांसह जाणते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते...

तर सदरच्या या प्रकरणी कारणेमोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक फटका बसतो... अशा प्रकारचे उपद्रव या परिसरात होत असल्याच्या तक्रारी आहेत... त्यामुळे पुढील पावले शेतकरी आक्रमक भूमिका घेत सदरील विभागाला  पशुसंवर्धन खाते किंवा स्थानिक प्रशासन पंचायत समिती, तहसीलदार, रोहा पोलिस स्टेशन आणि कोलाड पोलीस ठाण्यात लेखी निवेदन शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी देतील... तसेच यापूर्वी देखिल कोलाड आंबेवाडी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनीही अशा मागण्या केल्या असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post