पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा व युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आयोजित शिवजयंतीनिमित्त खारपाडा शाळेत वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न..!
या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत व पेण तालुका सचिव रमाकांत घरत यांनी केले होते... यावेळी रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा खारपाडा येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.हनुमान बाबू घरत यांनी शिवपुतल्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक कार्यकर्ते श्री देविदास रामा घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन करण्यात आले...
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समिती रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर मॅडम उपस्थित होत्या... सरपंच सौ.नेत्रा महेंद्र घरत, ग्रामपंचायत सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय घरत, सदस्य श्री.कांतीलाल घरत, सौ.अंजली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते... दिनकर पाटील सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले... शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले... शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रवीण लक्ष्मण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती संजय नाईक, दिनकर सूर्याजी पाटील, ज्योती दिनकर पाटील, प्रियांका समीर घरत, विद्या नागनाथ पवार शिक्षक वृंद अतिशय मेहनत घेऊन मुलांचा चांगल्या प्रतीचे शिक्षण देऊन संस्कारित करत आहेत... अनेक मुले नवोदय, स्कॉलरशिप परीक्षेत चांगले गुण प्राप्त केले आहेत... आजच्या स्पर्धांमधून देखील मुलांची सुंदर भाषणे झाली... चित्रकला स्पर्धेत देखील मुलांची कामगिरी छान आहे... एकंदरीत अभ्यासा सोबतच इतर कौशल्य देखील मुलांना शिकविले जातात. अनेक शैक्षणिक उपक्रम शाळेत राबविले जात आहेत... त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीचा भर आहे... शाळेची इमारत रंगोटी प्रवेशद्वार सर्व वर्गांना सीलिंग केलेली समोर प्रशस्त क्रीडांगण आहे... सुंदर असा बगीचा त्यामुळे प्रत्येकाला ही शाळा हवीहवीशी वाटते... त्यामुळे शाळेत प्रवेश केल्यावर खूप छान वाटते... रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा शाळेला ISO मानांकन प्राप्त झाले असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक विजेती शाळा आहे. प्रगती संजय नाईक मॅडम यांनी या स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले... एकूण १०० विद्यार्थी सहभागी झाले होते... गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, बाळ शिवाजी, जिजाऊ वेशभूषा करून मुले आली होती साक्षात शाळेत शिवकाल उभा झाला होता... छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ हर हर महादेव गर्जनेने शाळेचा परिसर शिवमय झाला होता... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक जिया संतोष घरत इयत्ता ७वी, द्वितीय क्रमांक निधी किशोर घरत इयत्ता ६वी, तृतीय क्रमांक शिल्पा शाम मुंबईकर इयत्ता ६वी यांनी पटकाविला तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कुणाल ज्ञानेश्वर म्हात्रे इयत्ता ७वी, द्वितीय क्रमांक रेहान राहुल घरत इयत्ता ५वी, तृतीय क्रमांक श्रीराज दिनकर पाटील इयत्ता ६वी यांनी पटकाविला सर्व विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र आणि एक्झाम पॅड, पेन, पेन्सिल सेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाळेतील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्या शाळेने मला घडविले तिचे, शिक्षकांचे अनंत उपकार आहेत त्यासाठी खारीचा वाटा का होईना तो उचलण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळाली असे मत व्यक्त केले. युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, गडसंवर्धन, गडकिल्ले माहिती पॉवरपॉइन प्रेझेंटेशन, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा, सांस्कृतिक नृत्य स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, शिवजयंती उत्सव,शिव शंभू राज्याभिषेक सोहळा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, भाषण कला, विद्यार्थी पालक आणि शिक्षक सुसंवाद कार्यशाळा, सर्प जनजागृती व्याख्यानमाला, विद्यार्थी करियर मार्गदर्शन शिबिर, व्यसनमुक्ती अभियान, समुपदेशन केंद्र सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम पत्रकार कैलासराजे घरत यांच्या अध्यक्षतेखाली युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन तर्फे राबविले जातात...
