महाराष्ट्र वेदभुमी

जनतेच्या जीवाशी खेळ नकली दुध (गुजरात)

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील): गुजरातमध्ये अन्न सुरक्षा आणि लोकांच्या जीवाशी खेळणारा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे... एका फॅक्टरीमध्ये चक्क युरिया आणि डिटर्जंट पावडरचा वापर करून भेसळयुक्त आणि विषारी दूध बनवलं जात असल्याचं समोर आलं आहे... विशेष म्हणजे हा काळा धंदा गेल्या ५ वर्षांपासून राजरोस सुरू होता!

नफा कमावण्यासाठी ही फॅक्टरी दूधामध्ये युरिया आणि डिटर्जंटसारखी घातक रसायने मिसळत होती, ज्यामुळे हे दूध आरोग्यासाठी अत्यंत घातक  बनले होते...

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अन्न सुरक्षा यंत्रणा (Food Safety Agencies) इतकी वर्षे काय करत होत्या? एका फॅक्टरीत इतका मोठा गैरप्रकार सुरू असताना कोणालाच सुगावा कसा लागला नाही?

ही केवळ यंत्रणेची लापरवाही आहे की यामागे काही मोठे अधिकारी किंवा नेत्यांचे हात आहेत? जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारांवर इतक्या वर्षांत कारवाई का झाली नाही?

अशा प्रकारचे विषारी दूध प्यायल्याने किडनी, यकृत आणि पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात, विशेषतः लहान मुलांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे...

"लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नराधमांना आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा मिळायला हवी? हा प्रकार केवळ एका राज्यापुरता मर्यादित असेल की आपल्या आजूबाजूलाही असं काही घडत असेल? 

Post a Comment

Previous Post Next Post