माणगाव :- (नरेश पाटील): दिवे लावायला सात महिने — उद्या काय? हा प्रश्न खांदाडचा काही भागंमध्ये नागरिक विचारत आहे. ऑगस्ट २०२५ च्या अखेरपासून माणगाव शहरातील खांदाड भागातील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे बंद होते... सात महिन्यांच्या कालावधीत वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावे करूनही नगर पं. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही... अखेर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पथदिवे सुरू झाले असले, तरी या विलंबाने नागरी उदासीनतेचे गंभीर चित्र समोर आणले आहे...
स्थानिक रहिवाशांनी तक्रार वहीत नोंदी केल्या, तोंडी तक्रारी केल्या तसेच व्हॉट्सअॅपद्वारे अनेकदा संदेश पाठवले... मात्र या तक्रारी महिनोन्महिने धूळ खात राहिल्या... परिणामी, पथदिवे बंद असल्यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला...
अंधाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर मगर व विषारी सापांचा वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या... मोबाईल टॉर्च व वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात मगर दिसण्याच्या घटना घडल्या... एका प्रसंगी तर अंधारातच मोबाईल व टॉर्चच्या साहाय्याने मध्यम आकाराची मगर पकडण्यात आली... तसेच पथदिवे नसलेल्या भागात विषारी साप मोकळेपणाने फिरत असल्याचे वारंवार निदर्शनास आले... गेल्या महिन्यात सापाशी संबंधित भीषण घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संध्याकाळनंतर नागरिकांना बॅटरी टॉर्चचा आधार घ्यावा लागत होता...
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात एका स्थानिक महिला निवासी नागरिकाने थेट नगर पंचायतच्या उपाध्यक्षांशी संपर्क साधल्यानंतर काही काळासाठी पथदिवे सुरू झाले होते... मात्र ही तात्पुरती उपाययोजना ठरली... २५ डिसेंबर २०२५ रोजी आमच्या वार्ताहराने न. पं च्या माजी अध्यक्ष यांना या गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती... त्यांनी संबंधित विभागाला सूचना दिले तरीही प्रत्यक्षात समस्या कायम राहिली...
११ जानेवारी २०२६ रोजी एकता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत पथदिव्यांच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला... महिनोन्महिने दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून बैठकीत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली...
अखेर सात महिन्यांनंतर शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यानंतर बंद पथदिवे काढून नवीन दिवे बसवण्यात आले. संध्याकाळ होताच हे दिवे कार्यरत झाले... धुमाळ यांचे निवासस्थान, निर्णय सर, किशोर डोंगरे, विनोद पालकर, अजित पवार, वालेराव, सौ. शिंदे, बाळा डीजे पोवार, वाडा परिसर, सार्वजनिक शौचालय तसेच इतर अनेक अंतर्गत रस्त्यांवर आता प्रकाश दिसू लागला आहे...
दरम्यान, खांदाडमधील एका युवा नेत्याने नगरपरिषदेला महसुली निधीची टंचाई असल्याचे निदर्शनास आणुन दिले तर ही बाब कारण पुढे केले तसेच पुष्ठी जोडले कि कचरा व्यवस्थापनातही गंटा गाडी बंद होऊन पॅक गाडी कचरा उचल करीत असल्याने ओला सुखा कचरा व्यवस्थापन ची तीन तेरा वाजली आहे... तर मूलभूत सुविधा देण्यात सात महिने लागणे ही बाब गंभीर असल्याचे नागरिकांचे मत आहे...
दिवे लावायला सात महिने — उद्या काय? हा प्रश्न केवळ पथदिव्यांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण नागरी व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर तो थेट बोट ठेवतो... आज दिवे लागले असले, तरी उद्या पुन्हा अंधार होऊ नये यासाठी सातत्यपूर्ण देखभाल, जबाबदारी आणि तत्पर प्रशासनाची नितांत गरज असल्याचे खांदाडवासीय स्पष्टपणे सांगत आहेत...
