महाराष्ट्र वेदभुमी

अयोध्या सायकल प्रवासवीरांचे रामटेकमध्ये आगमन...

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक:- भारतात विश्वबंधुता नांदावी, पर्यावरणाचा समतोल राखावा, स्वच्छतेचा पुरस्कार करावा, सहिष्णुतेचे वातावरण तयार व्हावे हा उद्देश घेऊन मु. तळोघी ता. नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथून तीन सायकलवीर श्रीराम जन्मभूमी अयोध्येसाठी निघाले आहेत... शुक्रवार  (दि.२०) फेब्रुवारीला रामटेकनगरीत त्यांचे आगमन झाले... महेश शिवणकर, भूषण लोंबले आणि द्यानेश्वर पराते असे त्यांची नावे आहेत... तीन युवक त्यांच्या साध्या सायकलने १२०० की.मी. चे अंतर पार करणार असून सायकल प्रवासाचे त्यांचे हे तिसरे वर्ष आहे... त्यांनी गडमंदिरचे दर्शन घेऊन कृनाल कावळे यांच्या घरी भोजन घेत थोडी विश्रांती घेतली... गांधी चौक येथे नगर परिषद स्वच्छता समिती सभापती सुमित कोठारी, शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर, रामराज्य ढोल ताशा पथकचे प्रमुख मोनू रघुवंशी, सृष्टी सौंदर्य परिवारचे सदस्य ऋषिकेश किंमतकर, सारंग पंडे, शेखर पाटील, विजय पडोळे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post