अलिबाग : माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने अलिबाग तालुक्यासाठी सहप्रचार प्रमुखपदी सुशील सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे... ही नियुक्ती दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे...
सदर पद हे मानद स्वरूपाचे असून, या जबाबदारीच्या माध्यमातून भारतीय संविधान, भारतीय कायदे तसेच फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे... नियुक्तीबाबत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुशील सुर्वे यांनी यापूर्वी सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला असून, माहिती अधिकार अधिनियम २००५ चा जनहितासाठी प्रभावी वापर करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे...
या पदावर राहून त्यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणे, तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याचा प्रसार-प्रचार करणे अपेक्षित आहे... समाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला... नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांनी ही भूमिका जबाबदारीने पार पाडत अलिबाग तालुक्यात माहिती अधिकार चळवळीला नवे बळ देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे...
