महाराष्ट्र वेदभुमी

पुनाडे येथील आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.

 

उरण दि १९(विठ्ठल ममताबादे): नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, आरोग्या विषयी जनजागृती व्हावी, नागरिकांना त्यांच्या घराजवळ दर्जेदार व उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने दिनांक १८/०२/२०२६ रोजी ग्रामपंचायत पुनाडे यांच्या सहकार्याने ,परिवर्तन , भारतकेअर , एच डी एफ सी बँक आणि निरामय हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावात जनरल हेल्थ चेकअप , हिमोग्लोबिन , शुगर , हाडांची ठिसूळता , डोळे तपासणी करून रुग्णांना लागणारे औषधे मोफत देण्यात आली.यावेळी डोळे तपासणी करताना मोतीबिंदू असणारे लोकांना रेफर केले.या कार्यक्रमाप्रसंगी रसिक बाबुराव पाटील (सदस्य ग्रामपंचायत), अंकिता अमीर ठाकूर (सदस्य ग्रामपंचायत),  अक्षता महेश पाटील (सदस्य ग्रामपंचायत), सुनील रमेश पाटील (सदस्य ग्रामपंचायत), सुप्रिया घरत (ग्रामविकास अधिकारी), अमीर श्रीराम ठाकूर, संदीप श्रीराम ठाकूर, निरामय हेल्थ फाउंडेशन स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.या आरोग्य शिबिराला नागरिकांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. चांगल्या कार्यक्रमाचे, आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याने नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचे कौतुक करत आयोजकांचे तसेच पुनाडे ग्रामपंचायतचे व सदस्यांचे आभार मानले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post