कोलाड (श्याम लोखंडे) श्री आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगांव येथील सापया मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण रविवार १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री. सापया कृपेने व ह.भ.प. गुरुवर्य ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने तसेच खा. सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष रा.काँग्रेस, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मा.आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रेरणेने व सकल संतांच्या आशिर्वादाने सांप्रदायिक प्रस्तुत कार्यक्रम होणार असुन या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची विशेष किर्तन सेवा सदरच्या या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहे...
या निमित्ताने दररोज सकाळी ४ ते ६ वा. काकड आरती, ८ते १० ते दुपारी ३ते५ वा.श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सायं.५ ते ६ वा. प्रवचन, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन, नंतर हरिजागरण होईल. यानिमित्ताने रविवारी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हभप भुषण महाडिक यांचे प्रवचन, हभप ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज गोसावी (लांजा )यांची किर्तन सेवा, सोमवारी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हभप श्रीकांत महाराज सरफळे यांचे प्रवचन, हभप अनिल महाराज सानप (वरसगांव) यांची किर्तन सेवा. मंगळवारी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हभप ऍडो. दिपाली महाराज सुतार यांचे प्रवचन, हभप अक्षय महाराज ओव्हाळ यांची किर्तनसेवा,
परंपरागत चालत आलेल्या या सप्ताह प्रसंगी बुधवार १८ फेब्रुवारी रोजी हभप नंदू महाराज तेलंगे यांचे प्रवचन, हभप पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री )आळंदी यांची किर्तनसेवा, गुरुवारी १९ फेब्रुवारी रोजी हभप शेळके महाराज यांचे प्रवचन, हभप चैतन्य महाराज निंबोळे (नाशिक) यांची किर्तनसेवा, शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी हभप नामदेव महाराज यादव यांचे प्रवचन, हभप डॉ.जलाल महाराज सय्यद (विद्यवाचस्पती-नाशिक) यांची किर्तनसेवा, शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी हभप ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज गोसावी यांचे प्रवचन, रात्री ८ ते १० वा. हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (नगर) यांची किर्तनसेवा, रविवारी २२ फेब्रुवारी रोजी हभप ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज गोसावी (लांजा) यांचे काल्याचे किर्तनसेवा सांगता समारोप प्रसंगी संपन्न होणार आहे...
सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी अध्यक्ष अजित आंब्रूस्कर,उपाध्यक्ष प्रभाकर सानप, गणेश सानप, सेक्रेटरी रविंद्र मामळुस्कर, खजिनदार सहादेव कापसे, रामचंद्र आंब्रुस्कर, मंगेश सानप,श्रीगणेश सानप, गणपत भालेकर, सहखजिनदार सचिन सानप, अमर मामळुस्कर, प्रतिक शिंदे, हिशोब तपासणीस तुकाराम सानप, अशोक लहाने, संजय राजिवले, रमेश सानप, राजेंद्र आंब्रुस्कर, सुशील शिंदे, ग्रामस्थ मंडळ वरसगांव, आदिनाथ सेवा मंडळ, हरिपाठ मंडळ, श्री सापया क्रिडा मंडळ व महिला मंडळ वरसगांव अपार मेहनत घेत आहेत...
