कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात रायगड जिल्हा परिषद आणि रोहा पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाले आहे. शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, या सुरळीत प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्या आहेत.निवडणूक कार्यक्रम मतदान प्रक्रिया ७ फेब्रुवारीला पार पडेल, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. जिल्ह्यात २,३२३ मतदान केंद्रे उभारली गेली असून, १७ लाख ३८१ मतदार सहभागी होणार असून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत...
रोहा तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ४ जागेसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत आणि पंचायत समिती गणांसाठी ८ जागेसाठी तब्बल २५ उमेदवार एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात उभे राहून निवडणूक लढवत आहेत. तर होत असलेल्या निवडणुकीत एकही जागा बिनविरोध झालेली नाही त्यामुळे उमेदवारांची एकमेकांसमोरील धाकधुक वाढली असली तरी मतदार राजे त्यांचा अधिकार आज मतदान करून हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासकीय तयारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या नेतृत्वात सुरक्षा,भरारी पथके आणि आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे...
सदर रोहा तालुक्यात निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड रोहा तहसीलदार किशोर देशमुख नेतृत्वात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी रोहा पोलीस निरीक्षक १सहाय्यक निरीक्षक २ ,उपनिरीक्षक ३, पोलीस कर्मचारी ८०, होमगार्ड ११० मतदान केंद्र १९४, प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष १, मतदान अधिकारी ३ सह १ शिपाई असे एकूण एका केंद्रावर ५ कर्मचारी त्याच बरोबर क्षेत्रीय अधिकारी २३, एस टी बस ३०,जिप ४०, शासकीय कर्मचारी, पोलीस असे एकूण १२०० कर्मचारी शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून निवडणूक केंद्राकडे रवाना झाले असून प्रत्येक केंद्रावर पोलिस आणि कर्मचारी तैनात केले आहेत...
