अंबाळा येथे ४० वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- शहरालगत असलेल्या अंबाळा तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार (दि.११) घडली. कुही तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी देविदास करामोरे (वय ४०) असे मृत तरुणांची नाव आहे... माहितीनुसार हरदोली येथील रहिवासी देविदास कारामोरे हे रामटेक येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते... बुधवार (दि.११) दुपारी ते अंबाळा तलावात पोहण्यासाठी गेले असता मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले... घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली... रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले... गुरुवार (दि.१२) सकाळी १०३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला... पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे...
