महाराष्ट्र वेदभुमी

आंबेवाडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद,साऱ्यांचे लक्ष निकालाकडे...

सर्वत्र मतदान शांततेत पार, 

कोलाड (श्याम लोखंडे) राज्यात गेली अनेक दिवस चर्चेचा विषय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतदान प्रक्रिया आज शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी आंबेवाडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शांततेत पार पडली असून या ठिकाणी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात मोठी चुरशीची आणि कडवी दुरंगी लढत झाल्याचे समजते मात्र विजयाची मदार ही मतदार राज्यांवर अवलंबून होती ती आज मतदारांनी बजावली आहे... कायदा आणि सुव्यवस्था राखत गटातील आणि गणातील उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्त्यांनी संयम राखून सदरील निवडणुकीला सामोरे जावे लागले असले तरी ही निवडणूक उमेदवारासह पक्षाच्या अस्मितेची असल्याने कार्यकर्ता आपल्या उमेदवाराला जास्तीचे मते कशी मिळतील याकडे धावाधाव करतांना दिवसभर दिसून येत होते...

निवडणूक केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या नियमावलीत प्रत्येक बूथ केंद्रावर नेमण्यात आलेले मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी आणि कर्मचारी त्याच बरोबर बाहेर पोलिस शिपाई यांनी आपली चोख कामगिरी बजावत दिवसभर प्रशासनाच्या काटेकोर नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.. मात्र कौल कोणाला हे आज यंत्रणेत गुप्त झाले असून निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार यांची मतांची आकडेवारी बेरजेची गणित सुरू झाली असून यांची धाकधुक वाढली असणार हे निश्चितच आहे...

गेली अनेक वर्ष हा जिल्हा परिषद मतदार संघ तटकरे यांच्या घराण्यात मात्र यावेळी त्यांच्या घराण्यातील उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने काही तर्क वितर्क जाणकारांकडून लावले जात असल्याचे बोलले जात आहे... मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्यात अत्यंत चुरशीची आणि कडवी दुरंगी लढत झाल्याचे या मतदार संघात प्रचाराच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांकडून पहावयास जात असून असून जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून निधी नरेंद्र जाधव तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सीमा समीर महाबळे यांच्या मोठी कडवी झुंज झाले आहे... आंबेवाडी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून संजय मांडुळस्कर तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सुरेशदादा महाबळे यांच्या मोठी चुरशीची आणि अस्मितेची अशी निवडणूक झाल्याचे बोलले जात होते... कोलाड गणातून राष्ट्रवादीकडून जगन्नाथ धनावडे तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शोभा मंगेश सरफळे यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे समजते मात्र विजयाची मदार ही मतदार राज्यांवर अवलंबून आहे त्यामुळे मतदार राज्यांनी मतदानाचा हक्क तर बजावला आहे पण मात्र ते कोणाच्या पारड्यात हे मात्र सोमवारच्या निकालातून स्पष्ट होईल...

Post a Comment

Previous Post Next Post