उरण दि १(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील प्रचाराला आता जोर आला असून चिरनेर जिल्हा परिषद गट व चिरनेर पंचायत गणातील महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. अविनाश विजय ठाकूर व महाविकास आघाडीच्या उमेदवार कविता रुपेश पाटील यांच्या प्रचाराचा वेग आता वाढत आहे... चिरनेर जिल्हा परिषद मतदार संघात प्रचाराचा धडाका वेगाने सुरू आहे. उमेदवार अँड अविनाश विजय ठाकूर हे केवळ उमेदवार नाहीत. तर जनतेतून घडलेले एक नेतृत्व आहे. सुशिक्षित व जागरूक समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्यामुळे सामाजिक व राजकीय वारसा त्यांना लाभला आहे... काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते चिरनेर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून विकासासाठी रणांगणात उतरले आहेत... तर मतदार संघाच्या विकासासाठी जे जे शक्य असेल ते मी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार संघातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न मोठा आहे... येथील गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही., हा नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले... पिरकोनचे उपसरपंच म्हणून काम करत असताना ग्रामपंचायतीत अनेक विकास कामांची पूर्तता त्यांच्याकडून झाली आहे. तसेच विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात ते प्रयत्न करीत आहेत. या चिरनेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये येथील मतदार त्यांच्या बाजूने ठाम उभा आहे... त्यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा त्यांना निश्चित होईल. असा विश्वास देखील येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे...
यावेळी महाविकास आघाडीच्या चिरनेर पंचायत गणाच्या उमेदवार कविता रुपेश पाटील यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांना जनतेबद्दल वाटणारी आत्मीयता दिसून आली... यावेळी त्यांनी अनेक शासकीय योजना घरोघरी पोहोचविणार असल्याचे सांगितले... महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असून स्त्रियांच्या आरोग्य संदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करणात येणार असल्याचे सांगितले... तसेच पाणी विजेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला... कोप्रोली ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून काम करत असताना त्यांनी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी चांगल्या पद्धतीने योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम केले... त्यामुळेच घराणेशाही न करता यावेळीही पक्षाने कविता पाटील यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली असून, त्या मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावाही येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे... प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्यासह अनेक छोटे मोठे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत... सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणून उमेदवार अँड अविनाश ठाकूर व कविता पाटील यांच्या रूपाने उमेदवार लाभले आहेत. कार्यकर्ते कानाकोपरा पिंजून काढून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी झटत आहेत...
