महाराष्ट्र वेदभुमी

अखेर प्रश्न मार्गी लागला; 'या' ५ गावांना मिळणार पिण्याचे पाणी

राज्यमंत्री जयस्वाल यांचे संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीचे निर्देश 

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक :- शब्दांपेक्षा कामावर विश्वास जनतेच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारा विकास अशी भावना सोनेघाट ग्रा.पं. सरपंच किरण टेकाम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व कार्यकर्ता दामोदर धोपटे यांच्या प्रयत्नाने आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दखलीमुळे सोनेघाटच्या पाच गावातील ग्रामस्थांनीव्यक्त केली असून, अनेक वर्षांपासून भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आज अखेर सुटली. समस्या मार्गी लागत असल्याने येथील ग्रामस्थांनी आभार मानले... तालुक्यातील ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या कवडक, टेकडी, माकडेवाडी, इंदिरानगर व पिपरियापेठ या भागात अनेक वर्षापासून भीषण पाणीटंचाई होती. या समस्यापोटी येथील नागरिक सोनेघाट ग्रामपंचायत चे सरपंच किरण टेकाम यांचे कडे पाणी समस्या सोडवण्यासाठी तगादा लावत होते व की सरपंच किरण टेकाम हे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हेलपाट्या मारत होते मात्र एवढे होऊनही सदर समस्या मार्गी लागली नव्हती तेव्हा हताश होऊन सरपंच किरण टेकाम यांनी आपले निकटवर्तीय माजी नगरसेवक तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे खंबीर कार्यकर्ते दामोदर धोपटे यांना सदर समस्येबाबत अवगत केले. धोपटे यांनी समस्येचे स्वरूप पाहता वेळ न गमवता सरपंच किरण टेकाम तथा पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दिनांक २४ जानेवारीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे कार्यालय गाठले. दरम्यान राज्यमंत्री जयस्वाल यांचे पुढे सदर समस्या ठेवताच आशिष जयस्वाल यांनी समस्येचे गांभीर्य पाहून तत्काळ संबंधित सर्व अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे सक्तीचे निर्देश दिले. एवढेच काय तर स्वतः स्पॉट वर जाऊन ऑन द स्पॉट फैसला केला...

'राजा बोले गड हाले ' म्हणीचा अनुभव

गेल्या अनेक दिवसांपासुन म्हणजेच जवळपास एक ते दीड वर्षापासून गटग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येत असलेल्या पाच भागात पिण्याच्या पाणी समस्याने ग्रामस्थ त्रस्त झालेले होते. तसेच सरपंच सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या हेलपाट्या मारू मारू हैराण झाले होते मात्र राज्यमंत्र्यांनी दखल घेताच व त्यांचे सक्तीचे आदेश कर्णपटलावर पडताच काल दिनांक २४ जानेवारीला शासकीय सुट्टीचा दिवस असूनही संबंधित सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गट ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या विविध पाचही भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई संदर्भातील अचूक कारणे शोधण्याकरिता मोक्का चौकशी केली व चौकशी दरम्यान निष्पन्न झालेल्या कारणांची पूर्तता करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. तेव्हा यावेळी सरपंच किरण टेकाम तथा पदाधिकारी व ग्रामस्थांना निश्चितच राजा बोले गड हाले या म्हणीचा अनुभव आला असावा...

Post a Comment

Previous Post Next Post