रामटेक:-नगरपरिषदच्या विविध समिती व सभापतिपदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली... पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष बिकेंद महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत गुरुवार (दि.२९) ला रामटेक नगरपरिषदेच्या विविध समिती व सभापतींची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली... यावेळी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह समस्त नगरवेकांची उपस्थिती होती...
नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन तथा मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार विविध सभापती व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली...
सभापती व समिती सदस्य
१) पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
सभापती:- आलोक मानकर
सदस्य:-रोशन चापले, पंकज लिल्हारे, अंशुल देशमुख, शीतल गजभिये
२) सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती :- विश्वास पाटील
सदस्य :- रजत गजभिये, माणिक ताकोत, दीक्षा शेंद्रे, विनिता आष्टनकर
३)स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती :- सुमित कोठारी
सदस्य :- प्रभाकर खेडकर, पंकज लिल्हारे, अभिषेक डाहारे, शालिनी महाजन
४) महिला व बालकल्याण समिती
सभापती :- सुरेखा माकडे
सदस्य :- कविता मुलमुले, प्रज्ञा अंबादे, शालिनी महाजन, पार्वती उईके यांची नियुक्ती करण्यात आली...
