महाराष्ट्र वेदभुमी

रस्ता सुरक्षा जनजागृती शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक: नागपूर ग्रामीण वाहतूक व रामटेक शाखेच्या वतीने सोमवार (दि.५) जानेवारीला कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथे रस्ता सुरक्षा जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी  अधिष्ठाता डॉ. पंकज  आष्टणकर होते... शिबिरात प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेंद्र तिवारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते... डॉ.पंकज आष्टणकर यांनी रस्ता सुरक्षेबाबत उपक्रमांचे महत्त्व विशद केले... कार्यक्रमात बोलताना ज्ञानेंद्र तिवारी म्हणाले की वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येतात... दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, वेगमर्यादा पाळणे व मोबाईलचा वापर टाळण्याचे, तर चारचाकी चालकांनी सीट बेल्ट वापरण्याचे त्यांनीआवाहन केले... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थिनी मोनाली राहंगडाले यांनी केले... कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इलेक्ट्रोमॅटिक्स फोरमने ने संस्थेचे सचिव व्ही. श्रीनिवास राव व प्राचार्य डॉ. अविनाश  श्रीखंडे यांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post