महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक न.प. बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार

साहेब... जरा बर्वे ले आऊट मध्येही फेरफटका मारा की.

सांडपाण्याचा डबक्यामुळे दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांपासून कर वसुली मात्र सेवा पुरविण्यात न. प. प्रशासन असमर्थ

प्रतिनिधी सचिन चौरसिया

 रामटेक:-  सारख्या विकसनशील शहरातील बर्वे लेआउट मध्ये विविध कर वसुली करूनही येथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी आजपर्यंत नाल्या करण्यातच आलेल्या नाही. परिणामस्वरूप घरातील सांडपाणी घरांच्या सभोवताल साचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. संतप्त नागरिकांनी साहेब जरा बर्वे लेआउट मध्येही फेरफटका मारा की ' अशी केविलवाणी हाक नवनिर्वाचित न. प. पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. नागरिकांना पाणीपुरवठा, खांबावरील दिव्या-बत्तीची सोय , सुयोग्य रस्ते, कचरा संकलन यासह विशेषतः नागरिकांच्या घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित नाल्या तथा इतर काही मूलभूत सुविधा पुरविणे हे तेथील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपरिषदेची जबाबदारी आहे. त्याच बदल्यात नगरपरिषद नागरिकांकडून घर कर, पाणी पट्टी कर वसूल करीत असते. परंतु बर्वे लेआउट येथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या करण्यातच आलेल्या नाही. परिणामस्वरूप घरातील सांडपाणी घरांच्या सभोवताल साचते. व त्यापासून दुर्गंधी तथा डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. न.प. पदाधिकारी निवडून येताच झपाट्याने कामाला लागले. न.प. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्वच्छतेची पाहणी करीत आहे. एवढेच नव्हे तर त्याचा सोशल मीडियाद्वारे गाजावाजाही करण्यात येत आहे. मात्र अद्याप बर्वे ले आऊट मध्ये अशी पाहणी करण्याकरता कोणताही पदाधिकारी न.प. अधिकारी फिरकला नाही. तेव्हा 'साहेब जरा बर्वे लेआउट मध्येही फेरफटका मारा की ' अशी केविलवाणी हाक येथील नागरिकांनी नवनिर्वाचित न. प. पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. विशेष म्हणजे विद्यमान मंत्री महोदयांचे निवासस्थान येथेच आहे .तरीसुद्धा येथील नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अशा स्वरूपाचा भयंकर प्रताप येथे करून ठेवलेला आहे की, नाल्या असून त्यांची सफाई नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेली नाही ही क्षुल्लक बाब माणल्या गेली असती, बर्वे ले-आउट फार जुना असून येथे नगर परिषदेमार्फत नाल्यांचे आजपावेतो बांधकामच करण्यात आलेले नाही ही मात्र मोठी व फार गंभीर बाब येथे उघडकीस आलेली आहे. यावरून नगरपरिषद रामटेक येथील बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार साफ साफ दिसून येतो. याविषयी बर्वे लेआउट येथील काही नागरिक हातात पावडा घेऊन स्वतःच सांडपाण्याला मार्ग देताना दिसून येतात ही रामटेक सारख्या विकसनशिल शहराच्या अनुषंगाने एक मोठी शोकांतिकाच म्हणावी. अशा शब्दात नागरिक संताप व्यक्त करतांना दिसत आहे...

समस्या अद्यापही गुलदस्त्यात

नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवक निवडून आल्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या सभागृहात पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यादरम्यान प्रतिनिधीकडून बर्वे ले आऊट मधील ही गंभीर समस्या समोर मांडली असता लवकरच ही समस्या मार्गी लावू असे आश्वासन मिळालेले होते, मात्र सध्या तरी कोणतीही हालचाल नगरपरिषद प्रशासनाकडून दिसून आलेली नाही तेव्हा ही समस्या केव्हा मार्गी लागेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post