महाराष्ट्र वेदभुमी

विश्वकर्मा समाजाच्या एकजुटीचे दर्शन : सुतार समाजाचे राजू रोडेकर दांपत्याला जाहीर पाठिंबा

माणगाव प्रतिनिधी: नरेश पाटील 

आपल्या विश्वकर्मा समाजामध्ये सोनार, लोहार, सुतार आदी अनेक घटक समाजांचा समावेश असून या सर्व समाजांची एकजूट आणि सामाजिक बांधिलकी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे... याच परंपरेतून सुतार समाजाचे सुपुत्र राजू मोहन रोडेकर उर्फ सुतार हे खरवली फाटा येथील रहिवासी असून ते ४५ गण निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत... त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी सौ. रिया राजू रोडेकर उर्फ सुतार या ४६ गण तळाशेत जिल्हा परिषद पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत...

 राजू रोडेकर यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय असून ते एका अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेले आहेत... प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समाजाविषयी असलेली तळमळ या बळावर त्यांनी आपले सामाजिक स्थान निर्माण केले आहे... समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः दुर्बल, गरजू आणि युवकांच्या हितासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत...

त्यांच्या या निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत, रायगड दैवज्ञ समाजासह संपूर्ण समाज बांधवांनी राजू रोडेकर व त्यांच्या पत्नी सौ. रिया रोडेकर यांना एकमुखी आणि जाहीर पाठिंबा दिला आहे... समाजाच्या विश्वासास पात्र ठरलेले हे दांपत्य समाजहितासाठी प्रभावी नेतृत्व देईल, असा ठाम विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे...

या अनुषंगाने, रायगड दैवज्ञ समाजाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रवीण केशव पिसाट यांनी सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी एक भक्कम व ठोस पाठिंब्याचे पत्रक काढून, राजू रोडेकर व सौ. रिया रोडेकर यांच्या उमेदवारीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला... या पत्रकामुळे समाजातील एकजूट, विश्वास आणि परिवर्तनाची इच्छा स्पष्टपणे दिसून येते...

विश्वकर्मा समाजाचा हा ठाम पाठिंबा राजू रोडेकर दांपत्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, येणाऱ्या निवडणुकीत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post