"सन्मान पत्रकारितेचा..सन्मान लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा"
पेण वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार, संपादक कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल “कोकणरत्न पदवी-२०२५” पुरस्काराने गौरविण्यात आले... हा पुरस्कार प्रदान सोहळा १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला... स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे... कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले आहे... स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले... श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला... या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर व्यासपीठावर उपस्थित होते... मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि सल्लागार श्री दिलीप लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला...
यावेळी पत्रकार कैलासराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी धर्मपत्नी सौ.मयुरी कैलास घरत मुलगी कु.ओवी कैलास घरत, मित्रबंधू श्री अरुण गावंड साहेब सोबत होते. गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे पेण तालुक्यातील खारपाडा गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांना प्रतिष्ठेच्या "कोंकणरत्न पदवी" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार कैलासराजे घरत यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे...
राष्ट्रीय पुरस्कार:-
१) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-२०२३
२) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-२०२३
३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४
४) नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड-२०२४
५) श्री शिरोमणी संत रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार-२०२४
*राज्यस्तरीय पुरस्कार* :-
१) कोकणभूषण पुरस्कार-२०२३
२) समाजरत्न पुरस्कार-२०२३
३) छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२४
४) महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४
५) आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२४
६) अष्टगंध कलामंच उरण-पत्रकारिता पुरस्कार-२०२५
७) बहिरीनाथ कलाप्रेमी यू ट्यूब चॅनेल वतीने
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५
८) रायगड विशेष सन्मान २०२५
पुरस्कार प्राप्त झाले आहेत... त्यांच्या या चतुरस्र कामगिरीबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे "कोंकणरत्न पदवी" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार कैलासराजे घरत यांनी ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न, स्थानिक स्तरावरील प्रशासकीय कामकाजातील त्रुटी अत्यंत परखडपणे आणि निःपक्षपातीपणे समाजासमोर आणल्या. त्यांचे तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडल्याने प्रशासनाला अनेक वेळा या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयी उपक्रम राबवित असतात...
रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात त्यांचे कार्य हीच त्यांची एक ओळख निर्माण झाली. कुठलिही अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत झटत असतात. त्यांना 'कोकणरत्न पदवी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचे पत्रकार मित्र, पुरोगामी पत्रकार संघ(भारत), सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, राजकीय पक्ष नेते, असंख्य वाचक, चाहते, हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या...