महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई देखिल सुरक्षित राहीलेली नाही, 6महीन्यात 268 मुली गायब झाल्या.

 मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील)

धक्कादायक: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 18 वर्षांपर्यंतच्या बेपत्ता किशोरवयीन मुलांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे... मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतून 370 हून अधिक किशोरवयीन मुले बेपत्ता झाली आहेत... त्यापैकी 268 मुली आहेत... एकूण दरमहा सरासरी 60 मुले बेपत्ता होतात... अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे...

मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे... बाहेरच्या राज्यातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत येतात, कामधंदा करतात आणि इथेच स्थायिक होतात... उत्तरप्रदेश- बिहार मधून मुंबईत येणाऱ्या लोकांची जास्त आहे त्यामागचं कारण मुंबई हे देशातील सुरक्षित शहर मानले जाते... मात्र आता याच मुंबईतून मागील 6 महिन्यात 268 मुली गायब झाल्यात... त्यामुळे खळबळ उडाली आहे...

मुंबई पोलिसांच्या मिसिंग सेलमध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की अनेक प्रकरणांमध्ये, प्रेम प्रकरणांमुळे अल्पवयीन मुली मित्रांसोबत जातात किंवा घराबाहेर पडतात... मात्र काही प्रकरणांमध्ये, मानवी तस्करीसह इतर समस्या देखील ओळखल्या गेल्या आहेत, ज्या गांभीर्याने घेतल्या जातात आणि त्यांची कसून चौकशी केली जाते... सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल ट्रॅकिंग आणि स्थानिक माहितीद्वारे बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात असताना, दरमहा दाखल होणाऱ्या नवीन तक्रारींची वाढती संख्या मिसिंग सेलसमोरील आव्हाने वाढवत आहे...

600 हून अधिक बेपत्ता मुले शोधण्याचा विक्रम असलेले मुंबई पोलिस अधिकारी राजेश पांडे म्हणतात की पालकांव्यतिरिक्त, कुटुंबे आणि शाळा प्रशासनानेही किशोरवयीन मुलांचे बदलते वर्तन, बदल आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी, मूल अचानक बेपत्ता झाल्यास, विलंब न करता त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करावी. शाळांनीही मुलांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे... ही फक्त पोलिसांची नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष: १०० आणि ११२ वर कॉल करा.. – चाइल्डलाइन एनजीओ (अल्पवयीन मुलाच्या बाबतीत)

१०९८ वर कॉल करा– जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये- ‘ट्रॅक द मिसिंग चाइल्ड’ पोर्टलवर ऑनलाइन (trackthemissingchild.gov.in)

Post a Comment

Previous Post Next Post