प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम २०२५ चा आढावा घेण्याकरिता चंद्रपूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे निवडणूक निरीक्षक यांनी रामटेक येथे मंगळवार (दि.१८) नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम व प्रत्यक्ष मतदान पूर्णतयारी, नगरपरिषद रामटेक क्षेत्रातील सर्व प्रभागातील मतदान केंद्रे (बूथ) तसेच स्टॉग रूमची पाहणी करत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला... आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या... आगामी नगरपरिषद निवडणूक पारदर्शक पध्दतीने खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात होईल, असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला... निरीक्षणादरम्यान त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रातील उपलब्ध यंत्रणा, सुरक्षाव्यवस्था, मूलभूत सुविधा व प्रवेशयोग्यता तपासली... मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, मतदान कक्षाची रचना, सीसीटीव्ही सुविधा, सुरक्षा बंदोबस्त, निवडणूक साहित्य साठवण व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती घेतली... स्ट्राँग रूमची सुरक्षा, सीलिंग प्रक्रिया, २४x७ निगराणी व्यवस्था व निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या... आगामी मतमोजणी प्रक्रियेच्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती घेतली... मतमोजणी केंद्रातील टेबल मांडणी, काउंटिंग हॉलमधील सुरक्षा व व्यवस्था, प्रवेश नियंत्रण प्रणाली तसेच सर्वांगीण तयारीची पाहणी केली व समाधान व्यक्त केले... निरीक्षकांनी नगरपरिषद रामटेक प्रशासनास निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, शांततापूर्ण व काटेकोर नियमांतर्गत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले असून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत... ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कोळपे यांनी दिली...
