वशेणी–उरण (अजय शिवकर): जनसेवेतून आनंद देणाऱ्या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकताच रविवार दिनांक १७/८/२०२५ रोजी वशेणी येथे विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या... स्विस लिग पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन राधाकृष्ण मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष ॲड गुलाबराव गावंड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्राध्यापक शिवहरी गावंड, ह .भ .प. नंदकुमार महाराज, बी.जे.म्हात्रे, अंकुश जोगले, विनोद पूरो, संदेश गावंड, सतीश पाटील, कैलास पाटील, पुरुषोत्तम पाटील ,आनंत तांडेल,संजय पाटील विश्वास पाटील, अनंत पाटील, किशोर म्हात्रे, गणेश खोत, हरिश्चंद्र ठाकूर,हरेश्वर पाटील, डॉक्टर रवींद्र गावंड, गणपत ठाकूर , महेंद्र पाटील, पुरण पाटील, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते...
आयुष्याच्या पटावर जरी आपण स्वतःच राजे असलो तरी जीवनाच्या शर्यतीत आपल्या वेड्यावाकड्या चालीने कुणालाही शह देण्याचा प्रयत्न करू नका, हेच मर्म या बुद्धिबळातून शिकावे* असे मत यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे कार्यवाहक श्री मच्छिंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले... या स्पर्धेसाठी ऑर्बिटर म्हणून श्री आदित्य संदीप पाटील यांनी उत्तमरीत्या काम पाहिले...
प्रथम क्रमांक धीरज धर्माजी पाटील (भेंडखळ) द्वितीय क्रमांक राज मदन पाटील (दिघोडे) तर तृतीय क्रमांक अनिश निवृत्ती म्हात्रे (वशेणी) यांनी पटकावला...
तर आण्विक धीरज पाटील (भेंडखळ) आणि शार्दुल संतोष म्हात्रे(कळंबोली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले...
यावेळी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तर विजेत्यांस वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या वर्धापनदिनी रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी अनुक्रमे ३०००, रुपये, २०००रुपये, १००० रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे...
