२०,५०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कोळपे, तथा पल्लवी राऊत यांची माहिती
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे... त्यामुळे आता रामटेक मध्ये राजकीय हालचालींना वेग येणार असून वातावरण तापू लागणार आहे. पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.६) नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद निवडणुकांविषयी महत्त्वाची माहिती दिली... नगरपरिषद प्रशासन तयारीला लागले असून, २०५०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगितले... नगरपरिषद निवडणूक कार्यक्रमानुसार शहरात एकूण दहा प्रभाग तयार करण्यात आले आहे... दहा प्रभाग मिळून पुरुष मतदार ९८७९ आणि महिला मतदार १०६२८ अशी एकुण २०५०७ मतदार संख्या आहे... मतदारांना २० प्लस १ असे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. दहा प्रभागांमध्ये तब्बल २८ मतदान केंद्र राहणार आहेत... निवडणुकीदरम्यान एसएसटी तथा एफएसटी ९ पथके तयार करण्यात आली आहेत...
अशी आहेत दहा प्रभागातील मतदान केंद्रे
प्रभाग-१) स्व. जतीरामजी बर्वे नगरपरिषद प्राथमिक शाळा, प्रभाग-२) स्व. रामजीपंत मठकर नगरपरिषद प्राथमिक शाळा तथा कै. विठ्ठलराव हटवार नगरपरिषद माध्यमिक शाळा, प्रभाग-३) कै. विठ्ठलराव हटवार नगरपरिषद माध्यमिक शाळा, प्रभाग. ४) श्रीराम विद्यालय रामटेक, प्रभाग, ५) स्व. सदाशिवराव किंमतकर नगरपरिषद प्राथमिक शाळा, प्रभाग, ६) समर्थ प्राथमिक शाळा, प्रभाग-७) समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय रामटेक, प्रभाग-८) स्व. मोहन मंगल सांगोडे नगर परिषद माध्यमिक शाळा, प्रभाग-९) राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक तथा प्रभाग-१०) राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक असे एकूण दहा प्रभागातील मतदान केंद्रांची नावे आहेत...
निवडणूक कार्यक्रम असा
नाम निर्देशन पत्र दाखल: १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर
छाननी :१८ नोव्हेंबर
माघारी व चिन्ह वाटप: २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर (अपील)
अंतिम यादी जाहीर: २६ नोव्हेंबर २०२५
मतदान:२ डिसेंबर २०२५
निकाल: ३ डिसेंबर २०२५
ऑनलाईन नामनिर्देशनाची सुविधा
या निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी आधुनिक सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे... उमेदवारांना आता ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे... संबंधित संकेतस्थळावर नामनिर्देशनाची माहिती भरून, ती आयोगाकडे सादर करता येणार आहे... तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे...
