पायाचे ठसे आढळले; भीतीचे वातावरण, वनविभागाने केली पाहणी
कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील खांब मेढा वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी सात च्या सुमारास उडदवणे आणि बाहे गाव परिसरात बिबट्याची डोंगरातून खाली रस्ता मार्गावर वावर आढळून आल्याचे बाहे , या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका नागरिकास आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली... आणि साऱ्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.. .याची तत्काल दखल घेत त्या इसमाने बाहे येथील कार्यतत्पर पोलिस पाटील मनोज थिटे यांना ही माहिती दिली तद्नंतर पोलिस पाटील थिटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सदरील वनविभाग आणि एस व्ही आर एस ची रेस्क्यू टीम यांना कळविले.. तद्नंतर वनरक्षक शिपाई,कर्मचारी आणि रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत या भयावह परिस्थितीची शोध मोहीम सुरू केली...
खांब मेढा विभागातील वन परिसरात उडदवणे गावानजीक डोंगर पायथ्याशी असलेल्या कालव्यातून बिबट्याने वावर करत तो पुन्हा त्याच मार्गाने डोंगरात मार्गस्थ झाल्याचे बिबट्याच्या पायाचे ठसे शोध मोहिमेतून आढळून आले असल्याचे वन रक्षक आणि कर्मचारी यांना दिसून आले... तर अचानक या परिसरात बिबट्याने वावर केल्याने येथील ग्रामस्थ नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजते... तर याबाबत वनविभागाचे कार्यक्षम अधिकारी वर्ग काय उपाय योजना करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे... तर बिबट्याचा वावर या परिसरात अचानक आल्याने येथील खांबसह बाहे ,उडदवणे ,धामणसई परिसरात भीतीचे वातावरण पसरले आले...
बिबट्याचे ठसे कालव्यातून वावर आणि येजा करणाऱ्या मार्गावर आढळल्याचे दिसून आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... अनेक गावांमध्ये बिबटे रात्रीच्या वेळी आणि शेताच्या जवळ आढळत असल्याने नागरिक आणि विशेषत: शेतकरी, पशुपालक यांमध्ये भीती आणि सतर्कता निर्माण झाली आहे...
प्रशासन व उपाययोजना वन विभागाच्या पथकाकडून गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे... तर नागरिकांनी सतर्क राहून मुलांची, वृद्धांची विशेष या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना वन विभागाकडून दिली गेली असून असून अधिक उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही वन विभागाने सांगितले आहे...
प्रतिक्रिया
समजताच वन विभाग आणि रेस्क्यू टीम साठी पाचारण केले तसेच त्यांनी तत्काळ येऊन पाहणी केली तर पाहणी दरम्यान रानटी डुकरांचा पाठलाग करत आले असे त्यांचे निदर्शनात आले त्याचबरोबर ज्या दिशेने आला त्याच दिशेने तो पुन्हा जंगलात परतला असे त्याच्या पाऊल ठसे शोध मधून आढळले तर या ठिकाणी प्रथमच बिबट्याच्या वावरामुळे घबराट, संताप आणि वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत... नागरिकांकडून त्वरित उपाययोजना आणि समर्थनाची मागणी सुरू आहे... तसेच या मार्गावरून रात्री अपरात्री प्रवास करताना शेतकरी तसेच धाटाव येथे जाणारा येणारा कामगार वर्ग यांनी देखील काही दिवस काळजी आणि सतर्क राहिले पाहिजे...मनोज थिटे पोलिस पाटील बाहे...
