महाराष्ट्र वेदभुमी

अखेर आप्पा देशमुख निवडणूक लढवण्यावर ठाम, राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्नचिन्ह ?



नाराजींचा मिले सुर मेरा तुम्हारा..काय होणार? याचीच चर्चा

रोहा प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव: प्रत्यक्ष राजकारणात नसलेले तरीही तटकरे कुटुंबावर विश्वासार्हता असलेल्या सामाजिक कार्यकर्ते, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठत्वाने खा सुनिल तटकरेंकडे रोहा नगरपालिका नगरसेवक उमेदवारीची मागणी केली‌... मूळात आप्पा देशमुखांची इच्छा असली तर कधीच पदे मिळाली असती... लोकनेते भाई पाशिलकर यांनी मागील अनेक निवडणूक काळात आप्पा देशमुखांना आग्रह केला होता... नगरसेवक उमेदवारी लढविण्याची इच्छाही बोलून दाखवली होती... हे सर्वेसर्वा नेत्यांसह सर्वजण मान्य करतात... याच मागोवा घडामोडींत आप्पा देशमुख यांनी आधी मनावर घेतले नाही... आज नगरसेवक उमेदवारीची इच्छा व्यक्त केली... त्या इच्छेला तांत्रिक बांबीची जोड दिल्याने आप्पा देशमुख यांसह समर्थक एवढेच काय ? मराठा समाजातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते कमालीचे नाराज झालेत... मराठा समाजातील सेवावृत्ती, दमदार नेतृत्वाला प्राधान्य दिले जात नाही... नगराध्यक्ष पदही ओबीसी महिला आहे... मग मराठा समाजाला प्रतिनिधित्व कुठे आहे ? अशी स्पष्ट नाराजी व्यक्त करत अखेर गुरुवारी आप्पा देशमुख यांनी निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचा निर्धार केल्याने रोहा राजकारणात एकच खळबळ उडाली... दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख हे खा. सुनिल तटकरेंचे विश्वासू सहकारी मानले जातात... मात्र देशमुख यांच्या उमेदवारी निर्णयाला तांत्रिक बाबींतून थांबा मिळण्याचे संकेत मिळाल्याने राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे, तर नगराध्यक्ष उमेदवारीचे प्रबळ दावेदार अशोक धोत्रे यांनीही अद्याप तलवार म्यान केली नसल्याचे सांगितले.. त्यामुळे प्रबळ नाराजींचा मिले सूर मेरा तुम्हारा होतो की काय ? असे झाल्यास पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार, तरीही एकदोन दिवसात नेमके काय घडते, नाराज आप्पा देशमुख काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे...

रोहा शहर, तालुका ग्रामीणात सामाजिक कार्यकर्ते, दायित्व म्हणून परिचित असलेले आप्पा देशमुख हे संयमी, मवाळ स्वभावाचे ओळखले जातात... सकल मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून आप्पा देशमुख यांनी लोकोपयोगी कामे केली... सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करीत आहेत... हेच आप्पा देशमुख लोकनेते भाई पाशीलकर यांना मार्गदर्शक तर खा सुनिल तटकरेंचे नेतृत्व मान्य करणारे ओळखले जातात... तटकरे कुटुंबाची असणारी जवळीक सर्वश्रुत आहे... पाशिलकर यांनी आप्पा देशमुख यांना वारंवार नगरसेवक उमेदवारी लढवण्याचा सल्ला दिला... मात्र देशमुख यांनी समाज कार्याला पसंती दिली... हे खुद्द खा तटकरेही मान्य करतात... अशातच होत असलेल्या रोहा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक उमेदवारी आप्पा देशमुख यांना मिळावी अशी मागणी समर्थक, हितचिंतक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली... उमेदवारीबाबत खा. तटकरे यांच्याशी सल्लामसलत झाली... तांत्रिक बाबीही व्यक्त झाली... त्यातून प्रवेशाबाबत तयारी होत असतानाच नव्या तांत्रिक बाबींवर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी साशंकता व्यक्त केल्याने उमेदवारीचे दावेदार आप्पा देशमुख कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते... मराठा समाजातील सामाजिक सेवाभावी दमदार व्यक्तीला प्राधान्य नाही... लोकनेते भाई पाशिलकर यांच्या इच्छेचा सन्मान होणार नाही... मग वेगळा निर्णय का घेऊ नयेत... पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करायला हवा, खा सुनिल तटकरे यांच्यावर विश्वास आहे... उमेदवारीबाबत निर्णय होईल असे सांगत नगरसेवक उमेदवारी लढवण्यावर ठाम आहोत असा पुनर्विचार आप्पा देशमुख यांनी केल्याने नेमके काय होणार ? याबाबत तर्कवितरकाला प्रचंड उधाण आले आहे... दरम्यान, सध्यस्थितीत नाराज उमेदवार आप्पा देशमुख हे प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी लढवण्यावर ठाम असल्याचे समजते... आप्पा देशमुख यांची नाराजी नगराध्यक्ष पदाचे प्रबळ उमेदवार शिल्पा धोत्रे यांच्या नाराजीत मिसळल्याने नाराजींचा मिले सूर मेरा तुम्हारा असे झाल्यास मागील निवडणुकीसारखी पुनरावृत्ती होऊ शकते अशी जोरदार चर्चा सुरू झाली तर नगराध्यक्ष उमेदवारीचे दावेदार अशोक धोत्रे यांनी तलवार म्यान न केल्याचे सांगितल्याने आता प्रतिष्ठित व्यक्ती आप्पा देशमुख यांनी प्रत्यक्ष तलवार उगारल्याने रोहा राजकारणात एकच खळबळ उडाली... आता ही नाराजी कुठवर जाते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post