प्रतिनिधी: सचिन चौरसया
रामटेक :- कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याने आपल्याच घरामागील शेताच्या वाडीत आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजाची झाड्यांची लागवड केली... रामटेक तालुक्यातील देवलापार तहसील अंतर्गत येणाऱ्या करवाही गावात अवैध गांजाची झाडे लागवड करण्याऱ्या नंदकिशोर वासुदेव कोकोडे (वय ४०) असे गांजाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे... स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली... आरोपी नंदकिशोर कोकोडे यांनी आपल्या घरामागील वाडीत गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलिसांबरोबर गुरुवार (ता.६) नोव्हेंबरला संयुक्त कारवाई करण्यात आली... पोलीस पथकाने करवाही येथे कोकोडे यांच्या शेतात छापा टाकला असता, शेताच्या वाडीत एकूण ०६ गांजाची झाडे सापडली... तपासात ही झाडे हिरवीगार अवस्थेत, त्याचे वजन २५.२६० किलो इतके निघाले... सदर गांजाची बाजारातील किंमत रुपये ७५ हजार ७८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले... नंदकिशोर वासुदेव कोकोडे या शेतकऱ्यांवर याप्रकरणी एनडीपीएस कलम २०(अ), २२ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... देवलापार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे आणि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली असून, देवलापार पोलीस पुढील तपास करत आहेत...
