महाराष्ट्र वेदभुमी

पर्यटकांना करावा लागतो खड्डेमय रस्त्यातून प्रवास

 

पवनी ते खिल्लारी गेट रस्त्याची दैनावस्था

प्रख्यात ' पेंच व्याघ्र प्रकल्पाला ' खड्डेमय रस्त्याचे गालबोट

प्रतिनिधी: सचिन चौरसिया

रामटेक : तीर्थक्षेत्र तथा प्रसिद्ध पर्यटनस्थळ पेंच व्याघ्र प्रकल्प आता दचके खटक्यांचा मार्ग असलेला स्थळ म्हणूनही नावरुपास येत आहे... पवनी खिल्लारी गेट रस्त्याची दैनावस्था झाली आहे... मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा याच रस्त्यावरून जातो.. मात्र, दचके खटके बसूनही मंत्र्यांना रस्त्याच्या दुर्दशेची जाणिव होत नाही, ही या मार्गाची शोकांतिकाच म्हणावी लागेल... पूर्वपेंच सिल्लारी गेट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे प्रथम पसंतीचे स्थान आहे... त्यांच्या संख्येत दिवसागणिक लक्षणीय वाढ होत आहे... परंतु, सिल्लारी गेटपर्यंतचा खड्डेमय रस्ता पर्यटकांचा पुरता हिरमोड करीत आहे... नागपुर - जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील पवनी गावापासुन पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट कडे रस्ता जातो... पवनीपासुन सिल्लारी गेटचे अंतर जवळपास सहा ते सात किलोमिटरचे आहे, आणि हा रस्ता पुरता जागोजागी उखडलेला असुन संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे... यावरून वाहनाने दचके खात जावे लागते... पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नावलौकिकाला गालबोट लागते... पर्यटक एक - एक हित उंच कुदत कुदत पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटपर्यंत शासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीवर संताप व्यक्त करीत पोहोचतात... तेव्हा या प्रख्यात व्याघ्र प्रकल्पाची प्रचिती पर्यटकांच्या माध्यमातून दुरवर कशी व कोणत्या पद्धतीची पोहचत असेल याचा सुईभर तरी विचार प्रशासनासह येथील स्थानिक लोकनेत्यांनी करणे गरजेचे आहे... अंत्र्या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हमखास दौऱ्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प दुरवर नावाजलेले आहे... येथील निसर्गरम्य परिसर, वन्यप्राण्यांसह वाघोबा दिसण्याची येथे हमखास शाश्वती तथा नावाजलेले तोतलाडोह डॅम आहे...  पवनी ते सिल्लारी गेट पर्यंत अनेक आलिशान रिसोर्ट येथे निवासासाठी उपलब्ध आहे तेव्हा येथे अंत्र्या मंत्र्यांसह न्यायालयीन जज, प्रशाषणाचे वरीष्ठ अधिकारी हमखास फेरफटका मारतात मात्र या सर्वांना या रस्त्यावरून जातांना हा खड्डेमय रस्ता खटकला नसावा याबाबद लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे...

प्रस्ताव पाठविला आहे - भोयर

 याबाबद जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी ' सदर रस्त्याचा प्रस्ताव तयार करून डि.पी.डी.सी. ला पाठविला आहे... प्रशासकिय मान्यता अद्यापही मिळायची आहे... ती मिळाल्यावर पुढील कागदोपत्री तथा इतर प्रक्रिया आटोपुन रस्ताकाम सुरु करू ' असे सांगीतले...

वनाधिकाऱ्याकडून रस्ता कामाला हिरवी झेंडी

पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांची भेट घेऊन या रस्त्याबाबद विचारणा केली असता ' पवनी ते सिल्लारी गेट पर्यंतचा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे व सिल्लारी गेट ते जंगल परिसरातील तोतलाडोह डॅम पर्यंतचा रस्ता हा पाटबंधारे विभागाकडे आहे. या विभागांनी रितसर परवानगी घ्यावी व वनविभागाच्या निकषानुसार रस्त्याचे काम करावे ' असे त्यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post