महाराष्ट्र वेदभुमी

लोकनेते दि.बा.पाटील अंदोलनाची पुढील दिशा, व चर्चासत्र,,,

 

नवीमुंबई दिघा येथे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात पार पडले !

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील): चार दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी भूमिपुत्रांचे दैवत वंदनीय राष्ट्रीय लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा केली नाही यामुळे प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे... केंद्र शासन या नावाला मंजुरी देईल असे राज्य शासनामार्फत सांगितले जात आहे... परंतु या विमानतळाच्या लोकार्पणाला अजून दोन महिने आहेत... या दोन महिन्यांच्या काळात सुद्धा दि बा पाटील साहेबांच्या नावाला मंजुरी मिळेल की नाही ही आता शंका निर्माण झाली आहे.

या अनुषंगाने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता आज दिनांक १२/१०/२०२५ रोजी दिघा,नवी मुंबई या ठिकाणी पाचही सागरी जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक भूमिपुत्रांचे खासदार माननीय सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली आणि पुढील दीड महिन्यांनी जे ऐतिहासिक आंदोलन होणार आहे या आंदोलनाची दिशा पुढील ठरवण्यात आली...

तसेच अनेक जिल्ह्य़ातील व शहरातील समाजसेवक,संघटना प्रतिनिधि संपादक,पत्रकार यांनी आपआपल्या क्षेत्रातील समस्या,कागदोपत्री अडचणी  मांडल्या साधारण क्लस्टर योजना,गावठाण विस्तार व सिंमाकन, गोचरण जमीन,पानथळ जमीन,समाजभवन , वाढीव एफएसआय या विषयावर खासदार सुरेश म्हात्रे यांनी सर्व समस्या लेखी स्वरूपात माझ्या कडे देण्याबाबत सुचवले मी लोकप्रतिनिधी म्हणून सरकार पुढे मांडून सोडविण्याचा प्रयत्न करीन असे अश्वासन दिले... शेवटी फक्त नवीमुंबईतील विमानतळ असे बोर्ड ज्यावर (दि.बा.पाटील) उल्लेख केला नाही... ते बोर्ड धाडशी कार्यकर्त्यांनी उतरवण्यास भाग पाडले अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला!

जय दि बा ..!! जय भूमिपुत्र..!!

Post a Comment

Previous Post Next Post