वरदा तटकरे यांच्याहस्ते शुभारंभ.
कोलाड (श्याम लोखंडे): राजकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, तसेच क्रीडा क्षेत्राची मोठी आवड आणि तळागाळातील क्रीडा खेळाडूना त्या त्या खेळात उत्तम दर्जा मिळावा खेळातून त्यांची उत्तम प्रगती व्हावी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यसाठी युवकांचे प्रेरणास्थान कोकणचे माजी आमदार अनिकेतभाई सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे एक भव्य दिव्य बुद्धिबळ स्पर्धा रविवारी 12 ऑक्टोबर 2025 रोजी रोहा तालुक्यातील रोहा कोलाड मार्गावर असलेले ओम नमः शिवाय,कालिदास मंगल कार्यालयात येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यांचे शुभारंभ मातोश्री वरदाई तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे...
या स्पर्धेचे आयोजन क्रीडा प्रेमी रूपेश बामुगडे व महेश बामुगडे यांनी केले असून, रोहा तालुका बुद्धिबळ संघटना सह-आयोजक म्हणून त्यांचा समावेवत कार्यरत आहे.तर सदरची स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे - खुला गट व अंडर 15 (15 वर्षांखालील) गट स्पर्धेसाठी तब्बल ₹40,000 हून अधिक रोख रक्कम आणि ट्रॉफी/पदकांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास ₹5,000 व ट्रॉफी, तर अंडर 15 गटातील विजेत्यास ₹3,000 व ट्रॉफी या खेळातून दिली जाणार आहे...
याशिवाय, सर्व वयोगटातील उत्कृष्ट खेळाडूंना विशेष बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विशेषतः U9, U11, U15, महिला, वरिष्ठ (60 वर्षांवरील) आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे...
स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाली आहे.प्रवेश शुल्क U15 गटासाठी ₹150 आणि खुला गटासाठी ₹300 आहे...
GMS, IMS, WGMS, WIMS, FMS, WFMS, WCMS, CMS यांच्यासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. सर्व खेळाडूंनी सकाळी 8:30 वाजता आपण आल्याची नोंद करणे आवश्यक असून, पहिली फेरी सकाळी 9:30 वाजता वरदाई तटकरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून सुरू होणार आहे तसेच या खेळात आतापर्यंत दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याचे समजते...
रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या खेळाचे शुभारंभ मातोश्री वरदाई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून यावेळी
मधुकरजी पाटील, विजयराव मोरे, विनोदभाऊ पाशिलकर, सुरेशजी मगर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे... तर विलास म्हात्रे सर, शंकरराव भगत, सौ. प्रितमताई पाटील, अमितजी उकडे, दत्ताजी चव्हाण, यशवंत रटाटे, नरेशजी पाटील, अमित मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे, विष्णुशेठ लोखंडे, दिनेशजी रटाटे, मुकेश भोकटे, यशवंत कडव, शिवाजी महाराज रटाटे, अनिलजी भगतमारुती पाटील सर, सुहास खरीवले, प्रदिप (अप्पा) देशमुख, जयवंत मुंढे, प्रदिपदादा बामुगडे, हिदास पाशिलकर, रामाशेठ म्हात्रे, नामदेव म्हसकर, सतिश भगत, अरविंद मगर, नथुराम माने, बाळाशेत पाबरेकर, रामजी महाडीक, सह आयोजक तालुका आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी आदी खेळाडू हे उपस्थित राहणार आहेत...
तर सदरच्या रायगड जिल्हा स्तरीय आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी आयोजक रुपेश बामुगडे, महेश बामुगडे, तसेच रोहा तालुका बुद्धिबळ संघटना या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत असून युवा युवती रसिक प्रेषकांनी तसेच या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थीत राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे...
