महाराष्ट्र वेदभुमी

सिंगापूर अंतरराष्ट्रीय विंडसर्फिग स्पर्धेत कास्य पदक

मुबंई प्रतीनीधी: (सतिश पाटील): उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता आठवी या वर्गात शिकणारी १३ वर्षीय विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील  केगाव - दांडा (उरण ) ही एक उत्तम जलतरणपट्टू असून MAHARASHTRA YATCHING ASSOCIATION कडून खेळणारी एक उत्तम विंडसर्फर देखील आहे... हिने अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत विंडसर्फिंग व काईट बोर्डिंग (अंडर 15) टेक्नो २९३ या समुद्रातील खेळात सात पदके पटकावून नाव कोरले आहे... भारताचे प्रतिनिधित्व करत सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विंडसर्फिंग स्पर्धेत TECHNO 293 U-15 खुला गट (मुले व मुली ) या विभागात  कांस्य पदक पटकावलं आहे. आणि सप्टेंबर 2025 मध्ये भोपाल, मध्य प्रदेश येथे झालेल्या राजा भोज मल्टीक्लास चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले आहे... सोबतच CESC REGATTA conducted by कॉर्प ऑफ engineers sailing क्लब पुणे, OCT-2025 PAWNA LAKE IN TECHNO-293. चॅम्पियनशिपमध्ये GOLD मेडल पटकावले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post