श्याम लोखंडे रोहा रायगड: राजकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण,सांस्कृतिक,तसेच क्रीडा क्षेत्राची मोठी आवड आणि तळागाळातील क्रीडा खेळाडूना त्या त्या खेळात उत्तम दर्जा मिळावा खेळातून त्यांची उत्तम प्रगती व्हावी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यसाठी युवकांचे प्रेरणास्थान कोकणचे माजी आमदार अनिकेतभाई सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे व रुपेश बामुगडे, महेश बामुगडे यांच्या वतीने एक भव्य दिव्य असे बुद्धिबळ स्पर्धा रविवारी 12 ऑक्टोबर 2025 रोजी रोहा तालुक्यातील रोहा कोलाड मार्गावर असलेले ओम नमः शिवाय,कालिदास मंगल कार्यालयात येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर सदरच्या या स्पर्धेचे शुभारंभ मातोश्री वरदाई तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले असून सदरच्या खेळात जिल्ह्यातील दीडशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत...
यावेळी विजय मोरे, विनोद भाऊ, आप्पा देशमुख, प्रीतम पाटील, अनिल भगत,रोहिदास पाशिलकर, दत्ता चव्हाण,नरेश पाटील, प्रदीप बामुगडे, जयवंत मुंढे, सुहास खरिवले, यशवंत रटाटे, अमित मोहिते, दिनेश रटाटे , विभा चोरगे, नामदेव म्हसकर, विठोबा बाकाडे सह,संकेत खोत,सह मान्यवर तसेच स्पर्धक आदी रसिक प्रेषक बहुसंख्येने उपस्थित होते...
