महाराष्ट्र वेदभुमी

जालगाव मध्ये वीज पडून लाखोंचे नुकसान

 

दापोली (डॉ. प्रशांत परांजपे) :- दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठ येथे आज २१ऑक्टोबर रोजी दुपारी 3:15 च्या दरम्यान वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

       आज  दिनांक २१ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास प्रचंड गडगडाट सुरू होता. याच दरम्यान जालगाव बाजारपेठ येथे वीज पडून सहा ग्रामस्थांचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे... 

     जालंगावचे तलाठी बोरसे ,पोलीस पाटील धीरज कदम , कोतवाल अनिकेत पाते यांनी पंचनामा केला आहे. त्यानुसार सुजय मेहता,अरविंद तलाठी,महेंद्र शेठ यांचे इन्व्हर्टर तर चंद्रशेखर बुटाला यांचेकडील टी. व्हि. आणि इन्व्हर्टर ,सूर्यकांत आपटे यांचेकडील चार पंखे,संदीप तलाठी यांच्याकडील सी सी टीव्ही,काजू फॅक्टरी मधील ड्रायर तसेच केतन आपटे  यांच्या घरातील इन्व्हर्टर जळला तसेच छताला लावलेले पॅनल लाईट जळून खाली पडले . एकंदरीतच ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जालंगाव बाजारपेठेत वीजेच्या फटाक्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होऊन उत्साहावर विरजण पडले. ही प्रवाही वीज फक्त जालंगाव बाजारपेठेतून काही क्षणात निघून निर्जन ठिकाणी कोसळली. जर ही वीज याच गजबजलेल्या भागात पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता... दुपारी याच दरम्यान दापोली तालुक्याच्या काही भागांत पाऊस कोसळला. मात्र जालंगावमध्ये जेथे विजेचा फटका बसला त्या परिसरात कडक ऊन पडले होते...

Post a Comment

Previous Post Next Post