कैलासराजे घरत खारपाडा पेण: मोठे वढाव ता.पेणचे ह.भ.प.कै महादेव दामा वर्तक यांचा अठरावा पुण्यस्मरण सोहळा,ज्ञानेश्वरी पारायण, हरी किर्तन, नाम गजरात संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. शिवाजी म्हात्रे(सर) यांनी पहिला व बारावा अध्याय पारायण वाचनाचे नेतृत्व केले. तसेच ह.भ.प.प्रशांत महाराज वर्तक युवा कीर्तनकार यांनी," चिंचेच्या पानावर बांधिले देऊन,आधी कळस मग पाया!'या नाथांच्या अभंगावर आत्मचिंतन केले. इंचगिरी सांप्रदायाचे सिद्ध पुरुष ब्रह्मचैतन्य शंकर महाराज रसाळ यांना कोकणात आणण्याचे महान कार्य बाबांनी केले. १९५४ साली वाशी विभाग रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी याबाबतीत दुर्लक्षीत होता.आपल्या सद्गुरूना शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाच वाजता उठून, मोठे वढाव ते पेण बारा किलोमीटर पायी प्रवास करून शहाणेशेठ यांच्या हॉटेलमधू पिण्याचे पाणी घेऊन, सद्गुरु उठण्या अगोदर सात वाजता मोठेवढाव येथे पोहोचायचे. महादेव बाबा शिकलेले नव्हते, पण सद्गुरुवरील श्रद्धा,व निष्ठा या मुळे महादेव बाबांचे जीवन सफल झाले. त्या काळात अनेक माणसे महादेव बाबांनी या सांप्रदायाला जोडली. महादेबाबा यांचे ज्येष्ठ पुत्र, श्री ह.भ.प.कृष्णा वर्तक (गुरुजी) हे उत्तम प्रवचनकार आहेत. जिल्हा, महाराष्ट्र राज्य, सांप्रदाय पुरस्कार प्राप्त असे, समाजभिमुख व्यक्तिमत्व आहे. मान्यवर अशा मोठ्या विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. तसेच कनिष्ट पुत्र ह.भ. प.पंढरीनाथ वर्तक, लीलाधर कृष्णा वर्तक (बिल्डर), घनश्याम प.वर्तक ,यशवंत प.वर्तक या परिवारावर ब्रह्मचैतन्य रा. रा.शंकर महाराज रसाळ तथा मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांची पूर्ण कृपा आहे. विद्यावाचस्पती दिनानंद स्वामी, महाराष्ट्र राज्याचे रसाळसंक्षप्रदायाचे अध्यक्ष गुरुभक्त तुकाराम महाराज रसाळ, ब्रह्मचारी तपस्वी गिरीजी महाराज अकोला यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. अन्नदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंचगिरी रसाळ संप्रदाय गुरुभक्त, वर्तक परिवार, म्हात्रे, परिवार यांनी परिश्रम घेतले...
