उरणधील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओनजीसी प्रकल्पात मोठी आग लागली आहे... ही आग लागल्याचे समजताच प्रकल्पाच्या प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले... अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली... सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे... त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे... ही आग लागल्यामुळे संपूर्ण उरण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे... याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही...आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे...मात्र अशा घटना ओएनजीसी घटनेत वारंवार घडत असून अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे...
