प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- थॅलेसिमिया आणि सिकल सेल वॉरियर्स कार्यक्रमाच्या निमित्ताने, (दि.२९ ) ऑगस्टला एन्रिको हाइट्स, नागपूर येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता... डॉ. कमलजीत कौर एस. रंधे, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या यांना माननीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थॅलेसिमिया आणि सिकल सेल या विशेष कार्याकरिता सन्मानित करण्यात आले... कार्यक्रम थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर यांच्या वतीने थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शन व प्रयत्नांमुळे आयोजित करण्यात आला. डॉ. कमलजीत कौर नागपूरच्या ऑरेंज स्टार आहेत, ज्या मागील १४ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत... आरोग्य सेवा आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून त्यांची सातत्यपूर्ण धडपड व समाजकल्याणासाठी केलेले कार्य आपल्या समाजासाठी उपकारक ठरत आहे. त्या आपल्या यशाचे व उपलब्धींचे श्रेय आपल्या परिवाराला व शुभेच्छुकांना देतात...
