महाराष्ट्र वेदभुमी

धक्कादायक ! दवाखान्यातील वेस्टची होतेय नियमबाह्य विल्हेवाट

स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

मेडिकल वेस्ट कचऱ्याची कोणतीही रासायनिक प्रक्रिया किंवा निर्जंतुकीकरण न करता दवाखान्याचाच परिसरात टाकतात

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-नगरधन येथील दवाखान्यातील वेस्टसंदर्भातील शासन नियमबाह्य उल्लंघन सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.. दवाखान्यातील मोठ्या प्रमाणावर मेडिकल वेस्ट दवाखान्याचा परिसरात टाकण्यात येत असून तो तिथेच जाळण्यात येतो... तालुक्यातील नगरधन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या असल्याने व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे परिसरातील नागरीकांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे... तालुक्यातील नगरधन येथील प्राथमिक "आरोग्य केंद्र हे तालुक्यातील मोठे केंद्र आहे... या आरोग्यकेंद्रात सहा खाटांची सोय आहे या केंद्रांतर्गत नगरधन, काचुरवाही, चिचाळा, डोंगरी अशी चार उपकेंद्र असुन, त्याअंतर्गत २६ गावे जोडली गेली आहेत... नगरधनचा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या परिसरात अस्वच्छता असुन येथे जिकडे तिकडे कचरा, घाण व खड्यात पाणी साचलेले असुन दवाखान्यातुन निघणारा मेडिकल वेस्ट कचरा कोणतीही रासायनिक किंवा निर्जंतुकीकरण न करता दवाखान्याच्या परिसरातच टाकुन तो मेडिकल वेस्ट कचरा तेथेच जाळल्या जातो...हा मेडिकल वेस्ट कचऱ्याचा व्यवस्थापनाकरिता डीप बेरीयल पिट  बनविलेले आहे परंतु दवाखान्यातून निघणारा मेडिकल वेस्ट दवाखान्याचा परिसरातच इतरत्र टाकुन जाळतात शिवाय जाळल्याने पर्यावरणास सुद्धा धोकादायक आहे... परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे परिसरातील नागरिकांचे व लागूनच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डॉ. वेळेवर उपलब्ध नसल्याने नगरधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे... याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे...

रुग्णालादिल्या जाणाऱ्या सुविधा

बाह्य रुग्ण व आंतर रुग्ण तपासणी व उपचार, २४ तास प्रसूती सेवा, प्रसूतीपूर्व व प्रसुती पश्चात सेवा, लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन साधने व शस्त्रक्रिया, लैंगिक आजाराचे प्रबंधन व उपचार, प्रयोगशाळा तपासणी, हिवताप रुग्ण, हत्तीरोग, कुष्ठरोग, क्षयरोग, सीकलसेल, निदान व उपचार, नेत्र रुग्ण तपासणी व उपचार, २४ तास गंभीर व आकस्मिक रुग्णसेवा अशा विविध सेवा दिल्या जातात...

Post a Comment

Previous Post Next Post