महाराष्ट्र वेदभुमी

'पेंच'च्या डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला

डाव्या कालव्यातून 45.31 क्युमेक पाण्याचा विसर्ग 

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- दोन महिनेउलटून आता तिसरा महिना सुरु झाला असतानाही राज्यभरामध्ये मान्सून दमदार हजेरी लावली असली तरी नागपूर जिल्ह्यातील रामटेक मात्र अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही... त्यामुळे धानाचा रोवण्या रखडल्या होत्या... मंगळवार (दि.29) ला पेंच जलाशयातील डाव्या कालव्यातून 45.31 क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून धानाच्या रोवणीला वेग आला... पाणी सुटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे... पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजु भोमले यांनी दिली. रामटेक तालुक्यात जूनमध्ये सरासरी १७५.२ मिमी तर जुलैमध्ये ३३०.९ मिमी पाऊस कोसळतो... तालुक्यात २४ ते ३० जुलै या सहा दिवसांत केवळ १०५ मिली पावसाची नोंद करण्यात आली... तालुक्यात १ जून ते ३१ जुलै या काळात ५१९.० मिमी पाऊस कोसळला... त्यामुळे धानाच्या बांध्यांमध्ये पुरेसे पाणी साचून चिखलणी व रोवणी करणे शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याने पेंच जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती... रामटेक व इतर तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेती पेंच जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहे... याच भागात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते... या जलाशयामुळे जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते...

जलाशयांची स्थिती

तोतलडोह जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता १,१६६ दलघमी असून, सध्या यात ७०.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा साठा ८१ टक्के होता... पॅचची एकूण क्षमता १८० दलघमी असून, त्यात ८८.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे... गेल्यावर्षी याच तारखेला या जलाशयात २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता... खिंडसीची एकूण पाणीसाठवण क्षमता १०३ दलघमी असली तरी त्यात सध्या ५८.८३ टक्के पाणी शिल्लक आहे... पेंच नदीवरील मध्य प्रदेशात असलेल्या चौराई धरणात सध्या ६१ टक्के पाणीसाठा आहे... हे धरण १०० टक्के भरल्यानंतर त्यातील पाणी आधी तोतलाडोह व नंतर पेंचमध्ये येते...

Post a Comment

Previous Post Next Post