उरण दि २८(विठ्ठल ममताबादे): गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. अनेक जण मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश देखील करत आहेत.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून उरण मधील तरुणांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.मावळचे लाडके खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पनवेल मधील जनसंपर्क कार्यालयात उरण विधानसभेतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.रोहित बाळासाहेब मस्के रा. नागाव म्हातवली,प्रणय प्रमोद वाघमारे रा. द्रोणागिरी,मयूर दत्ता पाटील रा. द्रोणागिरी,गणेश महादेव भिरजदार रा. केगाव,अनिल निमंग्रे रा. मुळेखंड यांनी नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे तसेच उरण तालूका प्रमुख दिपक ठाकूर, उरण तालूका ग्राहक संरक्षण कक्ष वीरू चाळके,भावेश भोईर व उपशाखाप्रमुख उपस्थित होते.तरुण वर्ग मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असून यामुळे शिवसेना पक्ष अधिक मजबूत, व्यापक होण्यास मदत होत आहे... पक्ष प्रवेश मुळे संघटना व पक्षाचे आचार विचार तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे...