मारळ येथील मार्लेश्वर देवस्थानचे पुजारी जंगम महाराज यांच्या हस्ते शिवपिंडीवर अभिषेक
सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी दरवर्षी केवळ श्रावण महिन्यातच समुद्रात असणाऱ्या सागरेश्वर शिवपिंडीचे दर्शन होते. यानंतर पुढील अकरा महिने शिवपिंडी दिसत नाही, हा एक निसर्गाचा चमत्कार असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते. यासाठी या शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून हजारो भाविक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित असतात. बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी संध्याकाळी मारळ येथील मार्लेश्वर देवस्थानचे प्रसिद्ध पुजारी श्री. जंगम महाराज हे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी दर्शन घेऊन शिवपिंडी वर अभिषेक घातला...
यावेळी त्यांनी किहीम येथील चामुंडा देवी मंदिर व काळभैरव महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्यासोबत सुदेश सावंत, योगेश साळुंखे, अभिजित महाले, दिनेश वर्तक, हरेश साळुंखे, आत्माराम साळुंखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : किहीम समुद्रकिनारी सागरेश्वर शिवपिंडीवर अभिषेक घालताना मार्लेश्वर देवस्थानचे पुजारी जंगम महाराज व उपस्थित किहीम सरपंच प्रसाद गायकवाड व इतर,
