महाराष्ट्र वेदभुमी

बहिरोळे येथे ढोल - ताशांच्या गजरात फोडल्या दहीहंड्या,

 


सोगाव-:अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण भक्तांनी व बाळगोपालांनी ढोल - ताशांच्या गजरात व पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर गल्लोगल्ली जाऊन दहीहंड्या फोडल्या... यावेळी सर्वामध्ये एकच उत्साह वाढला होता...

     यावेळी प्रत्येक घरोघरी मानवी साखळी धरून पोहोचलेल्या बालगोविंदांवर पाणी ओतून प्रसादाचे वाटप करण्यात आले... यामध्ये लहानांसह महिला व पुरुषांनी अशा सर्वानीच सहभाग घेत आनंद साजरा केला... भरपावसात दहीहंड्या फोडताना गोविंदा किरकोळ जखमी वगळता उत्सव कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेत पार पडला...

फोटो लाईन : बहिरोळे येथे दहीहंडी उत्सवात सहभागी श्रीकृष्ण भक्त व बालगोविंदांसह ज्येष्ठ नागरिक,

Post a Comment

Previous Post Next Post