महाराष्ट्र वेदभुमी

रोहा शहरातील कालवा रोड येथील कुटुंबांची घरे अखेर नावावर झाली.. !

रोशन चाफेकर यांच्या प्रयत्नांना यश 

खा सुनील तटकरे तसेच खासदार धैर्यशील पाटील यांचे विशेष आभार.....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पडला पार......

प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा

रोहा शहरातील गेले अनेक वर्षापासूनचा भूखंड २६८/१ अ येथील आणि अनियमित घरे नियमित करण्यासाठी संदर्भात प्रश्न प्रलंबित होता. सदर विषय भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांनी मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी संबंधित जागेची मोजणी करण्यात आली तसेच तेथील कुटुंबांकडून फॉर्म भरून घेण्यात आले होते मात्र पुढील अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिला. मात्र रोशन चाफेकर यांनी तिथे जातीने लक्ष देण्याचे ठरविले. भाजपकडून तेथील कुटुंबांसोबत डिसेंबर २०२४ मध्ये या संदर्भात बैठक घेऊन १९ जानेवारी २०२५ रोजी खासदार सुनील तटकरे साहेब यांना या संदर्भातले पत्र दिले. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तेथील सर्व कुटुंबांसोबत भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित भूखंडाची नव्याने मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्या समवेत जागेवर मोजणी करून घेतली. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी नगरपरिषदेला भुखंडाचा सुधारित नकाशा तयार करण्याबाबत पत्रव्यवहार केला. १७ एप्रिल २०२५ रोजी राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या रोह्यातील नियोजित बैठकीमध्ये प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत सदर विषयाचा पुन्हा पाठपुरावा केला. खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्या आढावा बैठकीत या विषयासंदर्भात अधिकारी वर्गास तत्काळ हा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. सदर विषयात २६ जुलै २०२५ रोजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी प्रांतअधिकारी यांच्यामार्फत सर्व माहिती मागवली व नागरिकांना पत्र वाटून देण्याबाबत पत्रव्यवहार केला व सूचना दिली... महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील अशा सर्व प्रकरणाबाबत तालुका निहाय कार्यक्रम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत...

रोहा शहरातील या कुटुंबांना अखेर त्यांचे हक्काची जागा व घरे मिळाली...महायुतीचे सरकार खऱ्या या प्रलंबित विषयावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदर कार्यक्रम रोहामध्ये २ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते घरांची सनद वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष समीर शेडगे, रोहा भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे , प्रांतअधिकारी खुटवड, मुख्याधिकारी अजय एडके, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती...

Post a Comment

Previous Post Next Post